महाराष्ट्र वेदभुमी

वाणदे येथे वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विशेष श्रम संस्कार शिबिर संपन्न...


शहानवाज मुकादम/रोहा मो.७९७२४२०५०२,

 मुरुड: (दि,३० डिसें २४) कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या (बॅ.ए.आर.अंतुले संकुल)राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वाणदे येथे सात दिवशीय विशेष श्रम संस्कार शिबिर विविध कार्यक्रमांनी संपन्न झाले...

 या शिबिराचा दि. 24 डिसेंबर 2024 रोजी समारोप  खारआंबोली येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने युथ फाॅर डिजिटल लिटरसी हे ब्रीद घेऊन दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत श्रम संस्कार शिबिर आयोजित केले होते. सदर शिबीरामधे जवळपास 100 विद्यार्थी सहभागी झाले होते...

 या सातदिवसीय शिबीरामध्ये स्वच्छता, अभियान,  शोषखड्डे, वनराई बंधारा, एड्स जनजागृती, व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण संवर्धन, प्लास्टिक मुक्त भारत हे उपक्रम राबविण्यात आले तसेच 19 डिसेंबर 2024 रोजी  समीर धांडोरे, पुजा तोंडलेपाटिल, स्नेहल कारभारी, अनुजा खोत यांनी एड्स जनजागृती बद्दल मार्गदर्शन केले व रक्त तपासण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक 21 डिसें 24 रोजी प्रा. चिंतन पोतदार यांनी डिजिटल साक्षरता व सोशल मिडीया हा जीवनाचा भाग बनला आहे ही एक आभासी जग आहे कोणती खबरदारी घ्यावी या विषयावर व्याख्यान झाले तसेच 24 डिसें 24 रोजी नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य निरीक्षक राकेश पाटील व शहर समन्वयक सचिन कोरके यांनी स्वछता व आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले तसेच ओला कचरा व सुका कचऱ्याची जनजागृती चित्रफीत दाखविण्यात आली तसेच सकाळी 7 ते 8 वाजता योगा प्रशिक्षक प्रमोद मसाल यांनी योगासनाचे विविध प्रकार आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे सांगून योगा प्रशिक्षणातून स्वयंसेवकाकडुन प्रत्यक्ष करुन घेतले.

दिनांक 23 डिसें 24 रोजी मुरुड तालुका मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष जाहीद फकजी व जयेश चोडणेकर यांनी प्रत्यक्षात शिबिरास भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत हितगुज केले. या सात दिवसीय शिबीर समारोपात तुकाराम पाटील यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे कौतुक केले पुढे ते म्हणाले या शिबिरामुळे आमच्या गावाची शोभा वाढली व गाव स्वछ केले विद्यार्थ्यांमधे चांगली सवय लागली आमच्या गावाची आठवण ठेवा व चांगले जिवन जगा असे ही सांगितले. या शिबिरातून युवकामधे सामाजिक जाणीव निर्माण झाली भावी जीवनात सामोरी जातांना आव्हानांना समर्थपणे सामोरी जाण्याची क्षमता निश्चित विकसीत होणार आहे असे आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. एस.एस.बहीरगुंडे यांनी मत व्यक्त  केले. सदर शिबिरासाठी महाविद्यालय विकास समीतीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. जी.डी. मुनेश्वर यांनी केले तर अनुष्का चव्हाण हिने आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post