महाराष्ट्र वेदभुमी

श्रीवर्धन मतदार संघ महायुतीचा झंझावत,लाडक्या बहिणीच्या प्रचारासाठी लाडका भाऊ अनिकेत तटकरे मैदानात.

कोलाड (श्याम लोखंडे ) ; रायगड श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार तथा मंत्री कु. आदिती तटकरे यांचा निवडणूक प्रचार सुरु झाला असून युवा नेते तथा विधान परिषदेचे मा.आ अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करत आहेत. तर उमेदवार अदिती तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी चक्क लाडक्या बहिणीच्या प्रचारासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांसमवेत या प्रचारात लाडका भाऊ मा.आ अनिकेत तटकरे हे स्वतः मैदानात उतरले असल्याचे सर्वत्र पाहवयास मिळत आहे.तर राष्ट्रवादी व महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत उमेदवार आदिती तटकरे यांच्या प्रचाराला आता जोरदार रंग चढल्याचे दिसून येत आहे त्यामुळे येथील निवडणुकीत अदिती तटकरे यांचा दुसऱ्यांदा विजय हा निच्छित मानला जात असल्याचे बोलले जात आहे...

गुरुवारी ७ नोव्हें  रोजी दमखाडी येथील  मंदिरात श्री साईबाबांचे मा.आ.अनिकेत तटकरे यांनी दर्शन घेऊन  उमेदवार आदिती तटकरेंच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्र. ७ मधील त्रिमूर्ती नगर ,गणेश नगर व स्वामी समर्थ नगर भागात मा.आ अनिकेत तटकरे यांच्या उपस्थिती झंझावत प्रचार  करण्यात आला. यावेळी घरोघरी प्रचारपत्रक वाटण्यात आली. या प्रचाराला महिला, युवक, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला...

यावेळी मा.आमदार अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, वसंतराव शेलार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अमित उकडे, भाजपा शहराध्यक्ष यज्ञेश भांड, शहराध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, मा. गटनेते महेंद्र गुजर, मा. नगरसेवक राजू जैन, महेश कोलाटकर, श्रद्धा पाटणकर, अजित मोरे, चंद्रकांत पार्टे, स्वप्नील धनावडे, निलेश शिर्के, गीता पडवळ, माझ सवाल यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,भाजप , शिवसेना शिंदे गट, मित्र पक्ष पदाधिकारी, महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ..

Post a Comment

Previous Post Next Post