महाराष्ट्र वेदभुमी

बुध.१३ रोजी शरद पवार यांचे म्हसळा येते सभा.


माणगाव (नरेश पाटील) 

म्हसळा : राज्य विधान सभेचे निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाले आहे... या अनुषंगाने १९३ श्रीवर्धन विधान सभा निवडणूक मध्ये  देशाचे ज्येष्ठ राजकीय नेते असलेले शरद चंद्र पवार साहेब यांचें राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गटातील)  उमेदवार अनिल नवगणे हे "तुतारी" या चिन्हावर निवडणूक लदवित आहे... दुसरीकडे श्रीवर्धन विधान सभा मतदार संघ महविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यातील एक प्रमुख भाग आहे... तर आपला पक्षाचे उमेदवार अनिल नवगने यांचा प्रचार करीता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे येत्या बुधवारी दि. १३ रोजी जाहिर सभा असल्याचे बाबत वार्तालाप करताना सांगितले आहे...सदर सभा हा म्हसळा तालुक्यातील म्हसळा शहर जवळचे काही हाके ची अंतरावर दिघी बोर्ली रोड येतील एका मैदानात आयोजन करण्यात आली आहे... हा सभा सकाळी १० वाजता होणार आहे... सध्या शरद पवार यांचे राज्यात प्रत्येक दिवस साधारणता चार ते पाच प्रचार सभाचे नियोजन आखण्यात आली आहे... तर दिनांक १३ नोव्हेंबर रोजी दिनाचे पहिली सभा हा रायगड जिल्ह्यातील म्हसळा येते होत आहे आणि एकमेव सभा शरद चंद्र पवार साहेब यांचे रायगड जिल्ह्यात होणार आहे कारण त्यांचा गटाला फक्त श्रीवर्धन विधान सभा करीता महविकास आघाडीचा फॉर्मुल्यात सोडले गेले आहे... दरम्यानचा काळात सदर सभेस सुमारे २० हाजाऱ्हून अधिक लोक येण्याची अपेक्षा असल्याचे मत माणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनी वर्तालाप करताना सांगितले आहे... सदर सभेचा ठिकाणी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार अनिल नवगणे यानी गुरुवारी दि. ०७ रोजी दुपारी दरम्यान पाहाणी केली आहे... यावेळी त्यांचा सोबत ज्ञानदेव पोवार, म्हसळा ता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजहर दनसे तसेच काही कार्यकर्ते उपस्थित होते...

 दरम्यानचा काळत सदर सभा करीता शिवसेना पक्ष उद्धव बाळा साहेब ठाकरे यांच्या गटाचे प्रमुख नेते खा. संजय राऊत हि उपस्थित राहणार असल्याचे माहिती हाती लागली आहे आणि काँग्रेस पक्षाचे ही काही दिग्गज नेते उपस्थीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post