सोगाव - अब्दुल सोगावकर :आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान अनेक संशयित व्यक्तींवर वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली असल्याचे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. भोई यांनी माहिती देताना सांगितले आहे...
यावेळी मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. भोई यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गुरुवार दि.७ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत विशेष ऑल आऊट ऑपरेशन करण्यात आले, यामध्ये दारूबंदीची ०१ केस, बीडब्लू वॉरंट बजावणीची ०१ केस, समन्स बजावणी ०३, हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेसची तपासणी करताना ०२ हॉटेलची व ०६ रिसॉर्टची कसून तपासणी करण्यात आली. याचवेळी चोंढी येथे नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन तपासणी करताना ५ वाहनांवर दंडात्मक केसेस दाखल करून त्यांच्याकडून १५०० रुपये दंड वसूल करण्यात आले. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हच्या ३ जणांवर केसेस दाखल करण्यात आले, यासोबतच ७८ संशयित वाहनांची व त्या वाहनांमधील ९८ संशयित इसमांची चौकशी करण्यात आली, अशा अनेक प्रकारची चौकशी करून अनेक संशयित व्यक्तींवर दंडात्मक व प्रतिबंधात्मक धडक कारवाई करण्यात आल्याची श्री. भोई यांनी माहिती देताना सांगितले...
फोटो लाईन : मांडवा सागरी पोलीस ठाण्यातर्फे विशेष ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान चोंढी येथे नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी करताना मांडवा पोलीस,
