महाराष्ट्र वेदभुमी

मनसेचे सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा



पनवेल ८ ऑक्टोबर( अजय शिवकर) : सध्या केळवणे ते खारपाडा रस्त्यांवरील  सातत्याने वाढती अवजड वाहनांची  वाहतूक असल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत..सदरचे खड्डे अतिशय खोलवर असून त्याच्यात अपघात  होऊन जीवितहानी होवु शकते... यासाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेना केळवणे शाखा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD ) मुख्य कार्यकारी अभियंता पनवेल रायगड यांना केळवणे ते खारपाडा रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे बुजवण्याबाबत लेखी निवेदन दिले..

या निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभाग(PWD ) मुख्य कार्यकारी अभियंता पनवेल रायगड महोदय, यांना सदर विषयांनुसार केळवणे ते खारपाडा या रस्त्यावर सातत्याने जड अवजड वाहतूक असल्यामुळें रस्त्यावर चालकांना वाहन चालवताना खूप मोठा त्रास होत आहे... खड्यात अनेक वाहनांचे नुकसान होत असून खड्डे चुकवताना अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत... मागील वर्षात तर या जीव घेण्या खड्ड्यांनी अनेक प्रवाशी जखमीही झालेत, खड्ड्यांमुळे रस्त्यांची चालन झालीय...शिवाय रस्त्यावर  कित्येक वाहनांचे नुकसान झालेले आहे... हे खड्डे नवरात्री उत्सवा अगोदर भरले गेले नाही, तर दुचाकी स्वरांचा जीव पण जाऊ शकतो... सध्या नवरात्री उत्सव आहे...नवरात्री उत्सवा अगोदर आपण याकडे तातडीने लक्ष द्यावे... नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात येईल...तरी आपण लवकरात लवकर खड्डे बुजवावे अशी इच्छा विनंती निवेदना मार्फत करण्यात आली...

यावेळी उरण तालुका अध्यक्ष सत्यवान भगत, कर्नाळा विभाग अध्यक्ष पनवेल उरण विधानसभा आशिष कृष्णा पगडे, वाहतूक सेनाचिटणीस उरण विधानसभा साईराज माळी, उपस्थित होते...

पक्षनेते प्रमुख राज ठाकरे, (अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 

Post a Comment

Previous Post Next Post