महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिर ५० जनांची तपासणी १६ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया.


पुगाव - खांब  (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे लायन्स क्लब कोलाड लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्या वतीने व ग्रूप ग्राम पंचायत तसेच तंटा मुक्त समिती पुगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.. याला येथील रुग्णांनी भरभरून प्रतिसाद देत सदरच्या शिबिरात पन्नासहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सोहळा जणांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून दृष्टी लाभणार आहे....

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४ यांच्या कृपाछत्राखाली तसेच क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली गेली चार वर्षे अविरतपणे कोलाड विभाग परिसरात कोलाड लायन्स क्लब ही सेवा भावी संस्था सामजिक शैक्षणीक कला क्रिडा सांस्कृतिक आरोग्य पर्यावरण अशा विविध क्षेत्रात काम करत ग्रामीण भागातील तळागाळातील गोर गरीब कष्टकरी शेतकरी जनतेच्या हितासाठी विविध उपक्रम राबवत आहे तर ऑक्टोबर दरम्यान या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला सेवा सप्ताह या उपक्रमाच्या माध्यमातून पुगाव येथील स्व. हरिभाऊ म्हसकर वाचनालय सामाजिक सभागृहात सदरच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते... याला भरभरुन प्रतिसाद मिळाला तर पन्नासहून अधिक रुग्णांची तपासणी करून सोहळा रुग्णांवर मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्यांना नवी दृष्टी लाभणार आहे...

यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ मंगेश सानप, सेक्रेटरी रविंद्र लोखंडे, खजिनदार राजेंदर कोप्पू,उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी, डॉ श्याम लोखंडे, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष नारायणराव धनवी, युवा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, बबन म्हसकर, गणेश म्हसकर, येलकर गुरुजी, राम धुपकर, मिलिंद गोठम, हरेश धुकोर, सुनील म्हसकर, रचना कलमकर मॅडम,राम कळमकर, सुधीर शेळके, संदीप कळमकर, दिनेश देशमुख,ललित म्हसकर, लायन मेंबर्स नंदकुमार कळमकर,अनिल महाडिक, मारुती मालुसरे, सौ पुजा लोखंडे, रिया लोखंडे मॅडम, दिनकर सानप, विश्र्वास निकम, विठ्ठल सावळे, दिलीप मोहिते सह लायन्स क्लबचे सर्व लायन मेंबर्स तसेच आदी पुगाव ग्रामस्थ आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग तपासणी टीम उपस्थित होते...

सदरच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन चंद्रकांत अधिकारी सर यांनी केले तर प्रास्ताविक प्रमोद म्हसकर रविंद्र लोखंडे यांनी केले तर प्रसंगी उपस्थित रुग्णांना लायन्स क्लबच्या माध्यमातून होत असलेल्या उपक्रमाबाबत अध्यक्ष डॉ मंगेश सानप, डॉ श्याम लोखंडे,तर तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष नारायणराव धनवी यांनी विशेष मार्गदर्शन करत लायन्स क्लबच्या कामाचे कौतुक करत सामजिक बांधिलकीचे जतन करून गोर गरीब कष्टकरी जनतेची उत्तम सेवा करत असल्याची प्रशंसा करत आभार व्यक्त केले...

Post a Comment

Previous Post Next Post