महाराष्ट्र वेदभुमी

स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचे शिलेदार सज्ज;अखंड गडसंवर्धन मोहिमेस प्रारंभ.



कोलाड (श्याम लोखंडे) : रोहा तालुक्यात गेली दोन वर्ष अविरतपणे गड संवर्धन करणाऱ्या स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांनी गडदेवता अन्साईमातेला नतमस्तक होऊन संवर्धनाचे शस्त्रपुजन करत गडस्वच्छता मोहिमेस नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून प्रारंभ केला आहे...

रविवारी ६ ऑक्टोबर रोजी सर्वत्र ठिकाणी नवरात्री उत्सवात दुर्गामातेचा जागर सुरू असताना स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या शिलेदारांना वेध लागले ते किल्ले सुरगडाची संवर्धन मोहिम चालु करण्याचे, नवरात्री उत्सवातील ९ दिवस हे आपल्या हिंदू संस्कृतीत अतिशय पवित्र मानले जातात... आणि या दिवसात केलेल्या संकल्पांची पूर्ती थेट आई जगदंबा पुर्ण करून घेते असे समजले जाते.. त्यामुळे येथील स्थानिक सुरगड संस्थेच्या माध्यमातून गड संवर्धन मोहीम राबवण्यात आली...

किल्ले सुरगडाच्या शिलेदारांनी आजपर्यंत बत्तीस मोहीम गडाची स्वच्छ्ता आणि संवर्धन करण्यासाठी राबविल्या असून रविवारी ६ ऑक्टोबरपासून तेहतीसव्या मोहिमेस प्रारंभ केला, तर २६ शिलेदारांनी आपला सहभाग नोंदवत जय भवानी जय शिवराय जयघोष करीत स्वच्छ्ता आणि संवर्धनास सुरुवात केली...

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय भोसले, मयुर कापसे, मंदार पार्टे, किशोर सावरकर, सुयोग धामणसे, योगेश गुजर, सुरज भिसे, नितेश कोंडे, विशाल पवार, रोशन जाधव, लवकेश जाधव, साहील जाधव, रितेश भोसले, अथर्व कापसे, पंकज सावरकर, विलास सुर्वे, मयुर मालुसरे, मनीष धामणसे, विराज तेलंगे, ललित पवार, श्रीयोग देशमुख सुरेश पार्टे, सिद्धेश शेलार, अरविंद भिलारे, महेंद्र पार्टे ( गडपाल ) सह शिलेदार उपस्थित होते...

स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची तेहतीसवी मोहिम अशाच काही नविन संकल्पासहित पार पडली...या मोहिममध्ये अन्साई माता मंदिर परिसर चौथारा स्वच्छ करून तटबंदीवरील पावसाळ्यात ढासळलेले दगड / चिरे यांचे संवर्धन करत व्यवस्थित लावण्याचं काम करण्यात आले... ते काम झाल्यानंतर देवीचं आणि शस्त्राचं पुजन करून शिलेदारांनी सामुदायिक आरती करून; गडसंवर्धन कार्यासाठी बळ दे..! अशी मनोभावे प्रार्थना देवीकडे केली... याचबरोबर पुढील मोहिम यशस्वी कार्यक्रमाविषयी संस्थापक अध्यक्ष यांसकडून मार्गदर्शन करण्यात आले... उपस्थित शिलेदारांना प्रसाद वाटप करून या मोहिमेची सांगता करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post