महाराष्ट्र वेदभुमी

श्रीवर्धन म्हसळयात जंगलपट्टयात अवैध खैरतोड खैर माफियाच्या मुसक्या आवळणार का?

 


रायगड विशेष प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि म्हसळयात या दोन तालुक्यात अवैध खैरतोड झाली असून वनविभाग खात्याच्या अजब कारभारामुळे वनविभागाचे कर्मचारी लाकूड व्यापा-याना हाताशी धरुन अवैध वृक्षतोड करत आहेत...मात्र वनविभाग स्वत: या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जातेय...

श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडला परिसरातील डोंगर माथ्यावर राखीव वनात खैरतोड केलेली असताना सबंधित बिट वनपाल थळे व वनरक्षक आणि वनअधिकारी पांढरकामे याच्या संगनमतानी या परिसरात अवैध वृक्षतोड झाल्याचे खळबळजनक आरोप नागरिकांकडून केले असून त्यांच्यावर योग्यती चौकशी करुन त्यांना निलंबित करण्याची कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी जोर धरत आहे..

या दोन तालुक्यात बेकायदेशीर खैर माफियानी थैमान घातला असून या दोन व्यापारीच्या विकास  जाधव  आणि विजय काते याच्या वनविभागाणे मुसक्या आवळ्याला पाहिजे तेव्हा राखीव वनात तोड करणारे मास्टर माईड जाळ्यात आले की वनविभागचा तपास सोपा होइल,असे नागरिकांकडून बोलले जात आहे...

म्हसळा तालुक्यातील बोॅलीपंचतन विभागीतील कोडे पांचटन तटकरे कावेरीच्या वरचा भाग तसेच धरणाचा वरचा भाग राखीव वनात खैर माफियानी थैमान घातला होता या नेमणूक करणा-या बिट वनपाल वनरक्षक याच्यावर निलंबित उच्च स्तरिय चौकशी करून कारवाई करण्यात यावी...

  माणगाव तालुक्यातील मौजै उणेगाव बिटात सरकारी वनातील मुल्यवान खैर जातीच्या झाडीची कत्तल करून होणारी चोरी संबधित सरकरी वनाचे रखवाल वनपाल वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच माणगाव वनक्षेत्रपाल तात्कालीन अनिरुद्ध ढगे यांच्यावर उणेगाव परिसरातील नागरिकांकडून निलंबित करण्याची मागणी निसर्ग प्रेमी कडून केली जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post