महाराष्ट्र वेदभुमी

रोह्यात बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग..

 

नराधमाविरुध रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असुन मुलींच्या संरक्षणाबाबत पालकवर्गात भीतीचे वातावरण...

शहानवाज मुकादम/रोहा

मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असून मुलींना शाळेत पाठविण्याचा विषयही ऐरणीवर आला आहे...बदलापूर येथील झालेल्या घटनेनंतर नराधमांकडुन मुलींवरील अत्याचार थांबतील असे वाटलं होते,मात्र रोह्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याने पुन्हा माता-पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या मुलींना शिक्षण घेण्यास शाळेत पाठवल्यास त्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित होत आहे...

रोहा शहरालगत असलेल्या भुवनेश्वर गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना दि:०७/१०/२०२४ रोजी घडली असून आरोपी मनीष सुग्राव विश्वकर्मा रा. अष्टमी ता.रोहा या नराधमाविरुद्ध रोहा पोलीस ठाण्यात कॉ.गु.र.नं.१८५/२०२४भा.न्या.स.क. ७४, ७८, सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२च्या कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

फिर्यादी यांची अल्पवयीन पिडीत मुलगी ही शाळेतून घरी परत येत असतानाच आरोपी याने पिडीत मुलगी ही अल्पवयीन शाळकरी असल्याचे माहित असताना मुलीचा पाठलाग करून " मेरी बहेन भी स्कूल से छुटी क्या "? असा बहाणा करीत तीच्या शरीराला गुप्त अंगाशी छेडछाड करीत तिचा विनयभंग केला...

 सदर गुन्ह्याचा तपास रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनात सह पोलीस निरीक्षक श्री रानडे करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post