महाराष्ट्र वेदभुमी

तळाघर विभागात विषारी वायू प्रदूषणाची 'मात्रा' वाढली, धुपारत सुरूच,

नागरिक हैराण..

प्रदूषण वेळीच रोखा, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा ; विठ्ठल मोरे 

प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा

         धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांत अपघाताच्या घटना घडत असतानाच विषारी जल, वायू प्रदूषणाने ही उच्चांक गाठला...याबाबत स्थानिक मुख्यत: एमपीसीबी प्रशासन अधिकाऱ्यांनाच गांभीर्य नाही. कंपन्यांना भेटीच्या नावाखाली मस्त चाललेय आमचं असेच खाते धोरण एमपीसीबीचे अधिकारी राबवत आलेत... त्यातून कंपन्या अधिकाऱ्यांचे धैर्य वाढल्याने  साॅल्वे, दानशमंद, अंथेआ, एक्सेल, युनिकेम कंपन्या परिसरातील तळाघर, बोरघर, निवी, लांढर गावांना वायू प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे... दररोज वायू प्रदूषणाची मात्रा वाढत धुपारत सुरूच असल्याने परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झालेत... डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, फुप्फुसाचे आजार , उलटी, जुलाब व्याधींनी डोके वर काढले... दवाखाने फुल्ल भरलेत... आधीच दररोजच्या विषारी वायू प्रदूषणाने भातशेती, कडधान्य यांसह सर्वच पिके कायम धोक्यात आलीत...शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी आजवर कोणीच प्रयत्न केले नाही... याच वास्तवात वाढत्या विषारी वायू प्रदूषणाच्या मात्राने सामाजिक स्वास्थ कायम धोक्यात आले आहे. दरम्यान, विषारी वायू प्रदूषण करणाऱ्या लगतच्या  साॅल्वे व अन्य कंपन्यांना वेळीच रोखावे, अन्यथा संबंधीत कंपन्यांविरोधात लढा उभारू, तर शेतीच्या नुकसानीबाबत लवकरच आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मोरे यांनी दिला... तर तळाघर परिसरातील विषारी वायू प्रदूषण तातडीने रोखण्यात एमपीसीबीचे प्रशासन अधिकारी यशस्वी ठरतात का? त्यावर बळीराजा फांऊडेशन नेमका काय पवित्रा घेणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

              एमआयडीसीतील अनेक कंपन्या अक्षरशः आजारी आहेत...नाजूक स्थितीतून जात आहेत. त्यातच वाढती राजकीय ठेकेदारी, सीएसआरचा मलिदा खाऊ धोरणाने बड्या कंपन्यांनाही झटका बसला आहे...हे भयान वास्तव असतानाच अनेक कंपन्या अपघाती घटना रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्या, ट्रान्सवर्ड पाठोपाठ साधना कंपनीच्या भयानक अपघातात चार कामगारांना जीव गमवावा लागला... तरीही घटनांतून स्थानिक मुख्यत: कारखाना निरीक्षक, एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी काहीच बोध घेतलेला नाही... अपघाती, प्रदूषणाच्या घटना सुरू असतानाच , साॅल्वे, अंथेआ कंपनीच्या मागील तळाघर, निवी, वरसे परिसरात दररोज सकाळी विषारी वायू प्रदूषणाची मात्रा सुरूच आहे... तब्बल आठवडाभर वायू प्रदूषणाच्या धुपारतीत भरतीच वाढ झाली...प्रदूषणाने डोळ्यांची जळजळ, खोकला, डोकेदुखी, मळमळणे, उलटी यांसारख्या व्याधी सुरू झाल्यात...हवेतील प्रदूषणाने सामाजिक स्वास्थ बिघडले...शहरातील दवाखाने फुल्ल भरलेत. विषारी वायू प्रदूषण रोखण्यात संबंधीत प्रशासन नेहमीच अपयशी ठरत असल्याने विभागीय नागरिकांनी संताप व्यक्त केला...आधीच सततच्या वायू प्रदूषणाने आमची भातशेती, कडधान्य व अन्य शेती नापीक केलीत...नुकसान भरपाई कधीच दिली नाहीत यावर बळीराजा फाऊंडेशन आक्रमक पवित्र्यात आहे... आता विषारी वायू प्रदूषणाने सामाजिक आरोग्यच बिघडवत आहात... वायू प्रदूषण वेळीच रोखा अन्यथा संबंधीत कंपन्यांना धडा शिकवू असा इशारा अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिला... शेतीच्या नुकसान भरपाईसाठी आंदोलन उभे करणार आहोत अशी अधिक प्रतिक्रिया मोरे यांनी दिली... वायू प्रदूषण तक्रारीबाबत एमपीसीबीचे अधिकारी यांच्याशी केलेल्या संपर्काला प्रतिसाद मिळाला नाही... वायू प्रदूषणाची एमपीसीबी तातडीने दखल घेतो का, त्यावर बळीराजा फाऊंडेशन काय भूमिका घेते ? हे पाहावे लागणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post