महाराष्ट्र वेदभुमी

महिला सशक्तिकरण अभियानचे ब्रायडल मेक-अपचे प्रशिक्षण


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- संपूर्ण जगभरात मनसरला आपली एक वेगळी ओळख करून देणारे जगातील सर्वात मोठा ओम म्हणुन लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या रामधाम (तीर्थ) मनसर येथे रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे दरवर्षी विविध सामाजिक निशुल्क उपक्रम राबवितात...

 या उपक्रमातूनच एक महिला सक्षमीकरण अंतर्गत दि.(५ आक्टोबर रोजी को-ऑपरेटिव्ह कृषी उद्योग रामटेक तर्फे महिला बचत गट सशक्तिकरण अभियान अंतर्गत आर्थिक विकासाकरिता तांत्रिक प्रशिक्षण शिबीर मार्फत माँ. पार्वती सभागृह, रामधाम तीर्थ मनसर येथे ब्रायडल मेक-अपचे एक दिवशीय प्रशिक्षण घेण्यात आले... या प्रशिक्षणाचे उदघाटन रामधामचे संस्थापक श्री. चंद्रपालजी चौकसे यांचा हस्ते करण्यात आले... या प्रशिक्षणात महिलांना ब्रायडल मेक-अप कसे करायचे व मेक-अप साठी काय-काय लागणार अशी सविस्तर माहिती सौं. दीपाली वाघमारे यांनी प्रशिक्षणात उपस्थित सर्व महिलांना दिली. या प्रशिक्षणात ३००० महिलांची उपस्थिती होती... बचत गटाच्या महिलांनी रोजगार प्राप्त होण्याकरिता उत्सुकतेणे प्रशिक्षणात सहभागी झाल्या... रामटेक को ऑपरेटिव्ह कृषी उद्योग मार्फत महिलांना सशक्त बनविण्यासाठी महिला बचत गटांना व युवक-युवतीना कुटीर उद्योग महिला बचत गट द्वारा निर्मित वस्तुंना नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक व इतर महानगर येथे विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येईल असा विश्वास श्री. चंद्रपाल चौकसे यांनी दिले... संचालन  जयश्री खोब्रागडे यांनी केले...

यावेळी श्री. दयाराम राय (राष्ट्रीय अध्यक्ष सरपंच संघटन), डॉ. योगीराज वाघमारे,  सुशीलाताई उदापुरे, डॉ. रेश्मा शेख, दीपालीताई वाघमारे, जितेंद्रजी ढवळे,  आरतीताई आत्राम, आरतीताई राऊत,  संगीताताई नाईक, वर्षाताई रहाटे,  मीनाताई भगत, रुपाली भगत, विजया हतोंडे, करुणा बिरो, धर्मेंद्र दुपारे, रामकली उमीले, माधुरी तांदुळकर, श्रेया मोहुर्ले, स्वेता महादुले व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या...

Post a Comment

Previous Post Next Post