आठ हजारांहून अधिक महिलांच्या उपस्थितीत महिलांचा संवाद मेळावा आ. महेंद्र शेठ दळवी, जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांचा करिष्मा
अलिबाग, दि. ६(सचिन पाटील)
कौठुंबिक वादात सापडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाला आता सर्वसामान्य नागरिकांनीही केराची टोपली दाखवण्यास सुरुवात केली आहे... काही दिवसांपुर्वीच शेकापच्या महिला नेतृत्वाने कुर्डुस परिसरातील तरुणांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते... या विधानाने येथील महिला देखील संतत्प झाल्या होत्या... त्यानंतर चार दिवसातच येथील हजारो महिलांनी शेकापला रामराम ठोकत अलिबाग- मुरुडचे लोकप्रिय आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहिर प्रवेश केला... या प्रवेशाने खारेपाटात शेकापचा सुपडासाफ झाला आहे...
एकेकाळी राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्व आता अलिबाग- मुरुड मतदार संघातील खारेपाट विभागातील काही गावांमध्येच शिल्लक राहिलेले आहे... यातीलच कुर्डुस-शहापुर हा जिल्हा परिषदेचा मतदार संघ शेकापसाठी सर्वात सुरक्षित मानला जात आसे, परंतु शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी आपल्या कार्यकौशल्याने हा मतदारसंघ शिवसेनेकडे वळविण्यात यश मिळवले... रविवार (ता.६) झालेल्या भव्य कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी यांच्या उपस्थित महिलांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला... ऐण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकापच्या अस्तित्वासाठी हा पक्षप्रवेश धोक्याचा इशारा समजला जात आहे... प्रवेश करणाऱ्या हजारो महिलांची शिवसेनेच्या सभामंडपातील ही पहिलीच सभा होती... या महिला शिवसेनेच्या नेतृत्वाकडून मिळणाऱ्या आदरातिथ्याने भारावून गेल्या...
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी म्हणाल्या, आमच्या मुलाबालांच्या चारित्र्यावर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही... निवडणुका आल्यावर आम्हाला किती अपुलकी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न शेकापच्या नेत्या करीत आहेत... वीज, पाणी, रस्ते, रोजगार असे अनेक प्रश्न असताना शेकापच्या नेत्या कुर्डुस-शहापुर या मतदार संघात कधीही फिरकल्या नाहीत... पिण्याच्या पाण्यासाठी येथील महिला पायपीट करीत असताना शेकापच्या नेत्यांनी त्यांची कधीही आठवण झालेली नाही... अशा बेफिकीर नेत्यांना येथील महिलांनीच जागा दाखवावी, असेही आवाहन मानसी दळवी यांनी केले... यावेळी अलिबाग-मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी यांनीही तुमच्यावर कोणतेही संकट आले तर मी पाठीमागे भावाप्रमाणे खंबीर उभा राहिन, असे आश्वासन दिले... या महिला कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रसिका केणी यांच्या संपर्कात होत्या... शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी आपले राजकीय कौशल्या दाखवत या हजारो महिलांना शिवसेनेत प्रवेश करण्यात यश मिळवले...
