महाराष्ट्र वेदभुमी

लायन्स क्लब ऑफ पनवेल मेघा चेकअप कॅम्प, डायबेटीज आणि आहार नियोजन मार्गदर्शन


ऑक्टोबर सेवासप्ताहानिमित्त आयोजन शिबीराला चांगला प्रतिसाद

पनवेल प्रतिनिधी

शुक्रवार दिनांक ०४/१०/२०२४ रोजी डायबेटिज तसेच नेत्र तपासणी, कान तपासणी, बोन डेन  सिटी तपासणी, ई.सी.जी  व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा विविध प्रकारच्या मोफत तपासण्यांच्या शिबीराचे आयोजन लायन क्लब ऑफ पनवेलच्या ऑक्टोबर सेवासप्ताहानिमित्त गोखले हॉल पनवेल येथे करण्यात आले होते...

तसेच लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष एस जी. चव्हाण यांनी मान्यवरांचे स्वागत करताना प्रास्ताविकामध्ये हेल्थबद्दल लोकांनी जागरूक असल पाहिजे हे या  मार्गदर्शन शिबीर भरवण्यामागचे उद्दिष्ट आहे असं सांगितलं...या सर्व तपासण्या करून पुढील उपचारासाठी पेशंटना डॉक्टरांचा सल्ला घेऊन तसेच कॅटरॅक्ट ऑपरेशन मोफत  केले जाणार आहेत....लायन ए.एस.एन.मूर्ती प्रिन्सिपॉल ऍडव्हायजर अँड डीसी साईट फर्स्ट यांनी शिबिराला भेट देऊन पेशंटना मार्गदर्शन केले... 


या शिबिरामध्ये जवळजवळ ८५ लोकांनी सहभाग घेतला होता... या एकत्रित मेघा चेकअपचा आणि मार्गदर्शन शिबिराचा वयोवृद्ध आणि गरीब अशा लोकांनी लाभ घेतला...प्रख्यात डायबेटॉलॉजिस्ट डॉ. कीर्ती समुद्रा एम. डी. मेडिसिन, व डॉ महेश पाटील डायबेटीज नुट्रीशिअन  याना सुद्धा आमंत्रीत करण्यात आले होते...


डॉ. कीर्ती समुद्रा, यांच्याकडून डायबेटिज का होतो,डायबेटिजचे प्रकार कोणते, डायबेटीज कसा कंट्रोल ठेवला पाहिजे आणि डायबेटिज बद्दल लोकांना समजेल असं आणि ते कंट्रोल ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे हे  वेगवेगळे उदाहरण देऊन विविध अंगाने आपल्या डायबेटिज बद्दलच्या वक्तव्यमधून समजावून सांगितले...

त्यांनंतर डॉ महेश पाटील डायबेटीज नुट्रीशिअन यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यामधून  लोकांना डायबेटिज बद्दल सांगताना असं म्हटलं आहे कि जर डायबेटिज  कंट्रोल ठेवायचा असेल तर त्यासाठी आपला दररोजच्या आहारामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स यांचे प्रमाण किती असल पाहिजे हे त्यांनी प्रेझेंटेशनमधून लोकांना मार्गदर्शन केले... आपला दररोजचा आहार कोणता असावा आणि तो नियंत्रित कसा ठेवता येईल. याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केले...

आहार योग्य असेल तर डायबेटिज सुद्धा कमी होईल आणि औषध सुद्धा कमी करता येईल अस सांगितलं... योग्य आहार आणि नियमित व्यायाम हेच डायबेटीजचे औषध आहे... असहि त्याच्या या  डायबेटिज अवेअरनेस मध्ये सांगण्यात आले...त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर बऱ्याच नागरिकांच्या डायबेटिज बद्दलच्या शंकांचे  निर्संन करण्यात आले... या डायबेटिज अवेअरनेसच्या शिबिराला नागरिकांकडून चांगला असा प्रतिसाद मिळाला, त्यामुळे अशी आशा आहे कि लोक हे आहार अमलात आणतील आणि त्यांचा डायबेटिज कंट्रोल राहील त्यामुळे त्यांची जीवनशैली बदलेल... आणि लायन्स क्लब ऑफ पनवेल ला आपण चांगलं काम केल्याचा आनंद होईल... 

या शिबिरासाठी अध्यक्ष ला. एस जी. चव्हाण , आर सी. ला. सुयोग्य पेंडसे, सचिव ला. अशोक गिल्डा, ला. ए एस एन मूर्ती डीसी साईट फर्स्ट, प्रो. कॉर्डीनेटर ला. ज्योती देशमाने, ला. मधुकर भगत, ला. राजेंद्र जेसवाणी, ला. भावना जेसवाणी, ला. लुईस कोलॅको, ला. सुरभी पेंडसे, ला. शोभा गिल्डा, ला. लेडी गीता म्हात्रे, ला. अलका चव्हाण, ला मंगला ठाकूर, ला. प्रतिमा चौहान , ला. प्रमोद गजहंस, ला. सुभाष पाटील इत्यादी लायन्स सदस्य उपस्थित होते...

या शिबिरामध्ये लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई कामोठे यांनीसुद्धा सहभाग घेतला होता. या शिबिरामध्ये अध्यक्ष अरुणा सावंत व सेक्रेटरी सुजाता तसेच ला. संदेश महाडिक , ला. दीपक जाजू उपस्थित होते...

प्रेस नोट अध्यक्ष ला. एस. जी चव्हाण

Post a Comment

Previous Post Next Post