महाराष्ट्रासह देश भरांतून होतोय अभिनंदनाचा वर्षाव !
रायगड लोकसभा मतदार संघात फटाक्यांची आतषबाजी
उरण मध्येही कार्यकर्त्यांचा जल्लोष
देशाचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा विकास दर वार्षिक ३ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान आर्थिक विकासात मोठा वाटा आहे असलेल्या कमिटीवर समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार सुनील तटकरे यांचे अभिनंदन होत आहे... ही त्यांच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी, विशेषतः रायगड आणि कोकणासाठी अभिमानाची बाब आहे... लोकसभा आणि राज्यसभेतील एकूण ३१ खासदारांचा या कमेटींत समावेश आहे. या समितीचे नेतृत्व आता सुनील तटकरे करणार असून, देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या आणि जास्त मागणी असलेल्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात हा सन्मान देण्यात आला आहे...या समितीच्या अध्यक्षपदी खासदार तटकरे यांची निवड केवळ त्यांच्या नेतृत्व कौशल्याचीच ओळख करून देत नाही तर त्यांच्या अध्यक्षतेखाली या प्रदेशातील धोरणे आणि विकासात महाराष्ट्र आणि रायगडची भूमिका किती महत्त्वाची आहे हे दिसून येते...
देशाच्या आर्थिक प्रगतीत कोकणाचा हातभार लागेल, त्यांची नियुक्ती महाराष्ट्राची आणि एकूणच संसदीय समितीचे अध्यक्षपदी निवड होणे ही महाराष्ट्रासाठीच अभिमानाची बाब आहे हे क्षेत्र राष्ट्रीय विकास आणि समृद्धीसाठी एक महत्त्वाचा आधार आहे असे या क्षेत्रांतील मान्य वरांनी मत व्यक्त करत अभिनंदन केले आहे...उरण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला... उरण तालुक्याचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर व सर्व पदाधिकाऱ्यांनी खासदार सुनील तटकरे साहेबांचे अभिनंदन केले आहे...