महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती,विधानसभा निवडणुकीआधी काम पूर्णत्वाचा लोकनेत्याचा मानस.



   कोलाड (श्याम लोखंडे ) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाला गणेश उत्सवानंतर वेगाने  सुरवात करण्यात आली असुन या राष्ट्रीय महामार्गाचे काम  विधानसभा निवडूनकीच्या अगोदर पूर्ण करण्याचा मानस  लोकनेत्यांचा असल्यागत सूचना ठेकेदारांना दिल्या असल्याचे एकंदरीत परिस्थिती वरुन दिसून येत आहे...

विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये लागण्याची शक्यता आहे.. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी महायुती पक्षाला फायदा व्हावा यासाठी मुंबई-गोवा मार्गाचे काम निवडणुकीअगोदर जलदगतीने पूर्ण करावे लागणार आहे... याची बाब लक्षात घेत या मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी  लोकनेत्यांचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु झाला असून मुंबई-गोवा महामार्गाचे कामाला जोरदार सुरुवात करण्यात आली असल्याचे ठेकेदार यांच्या कामाच्या गतिवरून निदर्शनास येत आहे...


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला १६ वर्षांपूर्वी सुरवात करण्यात आली होती... कामाच्या सुरवातीला हे काम खडी मिश्रित डांबरीकरण करुन  सुरवात करण्यात आली...परंतु या मार्गांवरील अती पावसाने हा रस्ता टिकाव धरू शकला नाही नंतर सर्व प्लॅन चेंज करुन या महामार्गाचे काम खडी मिश्रित सिमेंटने  बनविण्याचा निर्णय घेण्यात आला...व महामार्गाच्या कामाला नव्याने सुरुवात करण्यात आली...

मागील दस्तुरखुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गणेशत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी बाय कार ने करत संबधीत ठेकेदार शासकिय अधिकारी त्याच बरोबर काही ठिकाणी असलेले अडीअडचणी यावर तोडगा काढत वेगवेगळे तसेच नव्या कामांचा समावेश त्यावरील उपाययोजना याची माहिती देत लवकरात लवकर हे काम पूर्ण करा असे आदेश देण्यात आले...त्यामुळे सध्या पावसाची ही उघडदिप सुरू झाल्यामुळे मुंबई गोवा हायवे वरील काही टप्प्यातील अनाधिकृत टपऱ्या हटवण्याचे काम जोरदार सुरु झाले आहे...तसेच या मार्गांवरील इंदापूर, रातवड, तळवली, आंबेवाडी कोलाड नका, खांब, सुकेली खिंड, वाकण,नागोठणे या विविध  ठिकाणी साईड पट्टयांची काम, मोऱ्यांची कामे ब्रिजचे काम, उड्डाण पुलाचे काम, गटाराचे काम, अतिवेगाने सुरु केले असुन हे काम लवकरच लवकर पूर्ण केले जाईल असे या कामाच्या परिस्थिती वरुन दिसून येत असल्याचे चित्र दिसत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post