सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: जागतिक औषधी निर्माण दिनानिमित्त समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व निभावण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही हे शिबिर घेतले,रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ने समाज हिताचे कार्यक्रम रक्तदान व रक्त तपासणी शिबिर घेऊन जागतिक औषधी दिवस साजरा केला... सकाळी पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते आणि किमया हॉस्पिटल चे संचालक डॉ निनाद पाठक यांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले... उत्तम कामगिरी करणाऱ्या मा. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पदमेश अतुल किंमतकर यांचा दुपट्टा आणि गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला...अमेया पॅथॉलॉजी लॅब चे संचालक अंकुश ठवरे यांच्या द्वारे ७० व्यक्तींच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या... लाइफ लाईन ब्लड बँक यांच्या सहयोगाने सकाळी १० वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले. दोन महिला डॉ अंशूजा किंमतकर आणि श्रीमती मायवाडे यांनी पण रक्तदानाचे कर्तव्य पार पाडून महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही हे सिद्ध करून दिले...
शिबिराला ओम नमो चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, नप माजी सदस्य सुमित कोठारी, अनिल वाघमारे, नत्थु घरजाळे यांनी सदिच्छा भेटी दिल्या. रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे जनतेचे आभार मानून स्वास्थ लाभाच्या शुभकामना देण्यात आल्या. शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम केले..