पेण रायगड २६ सप्टेंबर अजय शिवकर : कोटक लाईफ इन्शुरन्स ह्यांच्या वतीने गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी महात्मा गांधी मंदिर पेण येथे गुंतवणुक आणि सुखकर भविष्यासाठी योजना मार्गदर्शन आणि जिल्हास्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले... त्यात जिल्ह्यातील विविध विभागातील पन्नास कवींनी उत्स्फुर्तपणे भाग घेवून उत्कृष्ट कविता सादर करून अनेक विषयांवर सामाजिक संदेश दिला...अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.. तसेच काही मान्यवर आणि अतिथींनी कवितेंद्वारे प्रबोधन केले....
विजेते स्पर्धक
प्रथम ---प्राजक्ता सागवेकर.. वावोशी पेण
द्वितीय------ अक्षता गोस्वावी ...नवी मुंबई
तृतीय ------ अशोक मढवी...पेण
उत्तेजनार्थ -- चेतन पाटील खोपटे उरण
यांना मानधन स्वरूपात पारितोषिक सोबत सन्मानचिन्ह, व सन्मानपत्र तसेच बाकी सर्व कवींना सहभाग - सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले...
संमेलनाचे संयोजन के.पी.पाटील, निवेदन निरंकार पाटील,तसेच काव्य संमेलनातील कवितांचे परीक्षण एन. जे पाटील आणि प्रकाश पाटील यांनी अगदी उत्तम प्रकारे केले...
कोटक लाईफचे डीएम श्री.अविनाश वाघमारे , एजन्सी असो. श्री. शिवदत्त कोठेकर आणि किरण पुजारी यांनी कोटक लाईफ मध्ये गुंतवणुक आणि सुखकर भविष्यासाठी विाविध योजनांविषयी मार्गदर्शन केले..