महाराष्ट्र वेदभुमी

१९३ श्रीवर्धन विधान सभेची जागा काँग्रेसला मिळण्यास चंद्रकांत पाटीलांनी बोलणी करावी


माणगाव प्रतिनिधी नरेश पाटील :- १९३ श्रीवर्धन विधान सभा ची जागा ही काँग्रेस आय. पक्षालाच येत्या काळात होणारी निवडणूकीत मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न प्रदेश काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकी दरम्यान करण्यात यावी... म्हणून माणगाव तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष विलास सुर्वे यांनी विशेष विनंती सभे दरम्यान केली आहे...  रविवारी दि.०१ सप्टेंबर २०२४ रोजी माणगाव पक्ष कार्यालयात दुपारी १२:३० च्या वेळेत पार पडले... महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस पक्षाचे कार्यकारीणी सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले... रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीस डॉ. नरेंद्र सिंह, माणगाव तालुका काँग्रेस पक्ष अध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन ता. अध्यक्ष सादिक भाई राऊत, तळा ता.अध्यक्ष शरद भोसले सह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते... सभेची सुरूवात विजय तोडणकर यानी प्रस्तावना केले... श्रीवर्धन येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता वाडकर यांचे निधन पर शोक व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली...

   चंद्रकांत पाटील यांचे स्वागत सादिक भाई राऊत यांनी पुष्प गुच्छ देवून सन्मानित केले...सर्व मान्यवर तसेच उपस्थित व्यक्ती यांना गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले...  उपस्थित पदाधिकारी , सदस्य तसेच कार्यकर्ता यानी काँग्रेस पक्ष बळकठी, अडचण, सूचना, निर्णय, मत प्रकट करुन पक्षवादी साठी संवाद साधून अभिप्राय नोंदवले... विलास सुर्वे यांनी भाषणात सांगितले की पाटील यांनी सर्व मुद्दे ऐकून घेतले आहे... या विभागात वरिष्ठ लोक पूर्णतः दुर्लक्ष केल्याने कुठेतरी हरवले सारखे वाटले मात्र यातूनही आम्ही पायवाट ठेवत पक्ष तारण्याच्या आम्ही प्रामाणिक प्रयत्न कोणाचेही सहकार्य नसताना केले आहे... संघटना असेल तर मान आहे... 

   दरम्यान काँग्रेसच्या राजवटीत संजय गांधी निराधार योजना राबविण्यात आल्याने गोर गरीब जनतेकरीता काँग्रेस पक्षाकडून कल्याणकारी योजना राबविण्यात आला... यात भर म्हणून खा.राहुल गांधी यांनी भारत जोडो अभियान राबविल्याने काँग्रेस पक्षाला पुन्हा वैभवाचे काळ मिळू लागले आहे... काँग्रेस पक्ष हे महात्मा गांधी यांच्या विचार तत्त्वावर चालणारी एक संघटना आहे...  पक्षाला दिशा भुल करणारा लोक नको आहे... कांग्रेस आय. पक्षाकरीता मेहनत करण्यात यावी.. विलास सुर्वे यांनी सभेस उपस्थित प्रदेश काँग्रेस पक्ष सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांना खास विनंती केली की, १९३ श्रीवर्धन विधान सभा जागे साठी कांग्रेस आय. पक्षाला मिळावी म्हणून आपण वरिष्ठांकडे मागणी करा असेही त्यांनी सांगितले..

दरम्यान पक्षाचे पदाधिकारी इम्तियाज कोकाटे,गणपत गमरे, विजय तोडणकर, सज्जाद सरखोत, वेटू पवार, खेळू गांबिर, महादेव आडीत, प्रकाश पालव, समिर बोरकर, तस्लिम बुरुड, राजा, अबरार काळोखे, शब्बीर इब्राहिम सौ. अनिता महाडिक सह आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post