महाराष्ट्र वेदभुमी

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीस विजयाची संधी- श्री.विजय तोडणकर



माणगाव (नरेश पाटील):  १९३ श्रीवर्धन विधान सभा मतदार संघ  काँग्रेस पक्षाची विचारमंथन सभा रवि. १/ ९/२०२४ रोजी माणगाव शहरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस  श्री.चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली... रायगड जिल्हा काँग्रेस चिटणीस डॉ. नरेंद्र सिंह, रायगड जिल्हा काँग्रेस चे ज्येष्ठ नेते विजय तोडणकर, माणगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास सुर्वे, श्रीवर्धन ता. अध्यक्ष सादिक भाई राऊत, तळा ता. अध्यक्ष शरद भोसले यांसह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते... सभेचे आयोजन माणगांव तालुका अध्यक्ष श्री. विलास सुर्वे यांनी केले होते... पक्षाचे ज्येष्ठ व  निष्ठावान नेते स्व. प्रभाकर वाडकर यांचे दुःखद निधनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली... उपस्थित पदाधिकारी , सदस्य, कार्यकर्ते यांनी काँग्रेस पक्ष बळकट करण्याकरिता  मत प्रकट करुन पक्ष वाढीसाठी संवाद साधून  आपापले अभिप्राय नोंदवले...

   श्री. विजय तोडणकर यांनी मत व्यक्त करताना लोकसभा निवडणुकीनंतर मतदार संघामध्ये महाविकास आघाडीसाठी अतिशय चांगले वातावरण असल्याचे सांगताना महाविकास आघाडीने सक्षम व जनतेमध्ये कार्यरत उमेदवार दिल्यास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले... तटकरेंच्या हुकूमशाहीला व कार्यप्रणालीला मतदार संघातील जनता कंटाळली असल्याचे परखड मतही  त्यांनी व्यक्त केले...

   आयोजक श्री.विलास सुर्वे यांनी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी यासाठी वरिष्ठांनी प्रयत्न करावेत असे आपल्या भाषणात सांगितले... चंद्रकांत पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले...

    दरम्यानचा काळात श्रीवर्धन ता. काँग्रेस उपाध्यक्ष तथा कोकण मच्छीमार संघटनेचे चेअरमन इम्तियाज कोकाटे, सरचिटणीस गणपत गमरे व ईतर ही आपला मत मांडले.सदर सभेस पक्षाचे महत्वाचे पदाधिकारी  इम्तियाज कोकाटे,गणपत गमरे,  सज्जाद सरखोत, वेटू पवार, खेळू गांबिर, महादेव आडीत, प्रकाश पालव, समिर बोरकर, तस्लिम बुरुड, राजा, अबरार काळोखे, शब्बीर फकीर, सौ. अनिता महाडिक यांसह  मोठ्या संख्येने  कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post