संजय सत्येकर ( प्रतिनिधी नागपूर ) : राज्यात सन २०२०,२०२१,२०२२ या वर्षात शेती श्रेत्रात विविध प्रकारचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४८८ शेतकऱ्यांचे राज्याचे मामहिम मा. राज्यपाल श्री. सी. पी राधाकृष्णन यांचा हस्ते सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला... यात मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा.उपमुख्यमंत्री अजित पवार, मा. कृषिमंत्री धनंजय मुंढे यांचा प्रमुख उपस्थिती राहणार होती...
कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून शेतकरी सहपरिवार (स्वखर्चाने) सरकारच्या कृषि विभागाच्या आग्राहस्त मुंबई इथे जमा झाले...
कार्यक्रमाच्या ऐनवेळी आयोजकांकडून समजले की, मा.मुख्यमंत्री व मा.उपमुख्यमंत्री फडणवीस गैरहजर राहणार आहेत.. आणि तसेच मा. राज्यपाल फक्त ४५ मिनटात वेळ देणार आणि सर्व ४८८ शेतकऱ्यांना सन्मानित करून निघून जाणार याचा अर्थ एका शेतकऱ्यांला ३-६ सेकंद वेळ फक्त जे की अशक्य आहे...
ज्या पुरस्कारासाठी शेतकऱ्यांना ३-४ वर्ष वाट पाहवी लागली... आणि कार्यक्रमासाठी सरकारकडे शेतकऱ्यांसाठी फक्त ३-४ तासही नाही... हा तर शेतकऱ्यांच्या अपमान आहे... याचा आक्रोश म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या डोक्यावरील फेटे भेकून याचा विरोध प्रकट केला...
यावर राज्याचे मा. कृषिमंत्री मुंढे यांनी शेतकऱ्यांची भावना पाहून तात्काळ निर्णय घेऊन मा.राज्यपाल साहेब कार्यक्रमाला पूर्ण वेळ देतील अशी घोषणा केली...यावर सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला... आणि सर्व सम्मान सोहळा पार पडला...