गंगापूरवा सीयांमध्ये संतापाची लाट प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी
जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून सचिन महाजन व गावकऱ्यांची मागणी
हिंगणघाट वार्ताहर: तालुक्यातील गांगापूर गावात मागील अनेक वर्षापासून स्मशानभूमी व अंत्यसंस्कारासाठी शेडदेखील उपलब्ध नसल्याने मरणानंतरही यातना सोसावी लागत असल्याने गंगापूरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे... स्ट्रीट लाईट व अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध करण्याची मागणी गावकऱ्यांकडून वर्धा जिल्ल्हाहाचे4चे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कडे सामाजिक कार्यकर्ता सचिन महाजन यांनी निवेदनातून केली आहे... गंगापूर गावात मागील अनेक वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे. जागा आणि साहेब लक्ष द्या हो. Wardha जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन सचिन महाजन यांनी गेल्या वर्षी गांगापूर गावात वेदिका हेमंत कडू यांची १६ वर्षाची मुलगी मरन पावली होती, सतत धारा पाऊस सुरू असल्याने तिचा घरी मृतदेह ठेवला ,दुसऱ्या दिवशी पाऊसात अग्नी दिली , तिथे स्टिथ लाईट सुद्धाव्यावस्तात नाही, अशी माहिती दिली ..
स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण होते...साहेब आता पावसाळा सुरु आहे... आता तरी स्मशानभूमीसाठी जागा द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सचिन महाजन यांनी वर्धा जिल्हाधिकारी मा राहुल कर्डिले यांच्याकडे केली दिली.... शेतकरी नरेश हाते,यांच्या शेतात जवळच त्यावर शेड उभारण्याबाबतची मागणी हिंगणघाटचे तहसीलदारांकडे २०२१ अनेकदा निवेदनातूनही केली आहे... मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात आहे...पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे... चिखलातून मार्गक्रमण करत रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार पार पाडावे लागत आहेत... पाऊस सुरू असल्यास पाऊस बंद होण्याची वाट पाहून अंत्यविधी पार पाडला जातो आहे... गेल्या काही दिवसांपूर्वी वेदिका कडू नामक विद्यार्थिनीचा आकस्मिक मृत्यू झाला होता... अंत्यसंस्कारासाठी पूर्ण तयारी झाली होती...मात्र, संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करता आला नाही...अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक व इतरांना परत जावे लागले... दुसऱ्या दिवशी सदर मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर आली होती... विशेष म्हणजे, संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीकडे वनविभाग वणपाल फॉरेस्ट अधिकारी यांच्या कडे अनेक वर्षांपासून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून शेड निर्मितीची मागणी केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष का केले जाते...हा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे... प्रशासनाने याकडे लक्ष देत तत्काळ स्मशानभूमीसाठी जागा आणि शेड उभारण्याची मागणी गावकऱ्यांकडून सचिन महाजन यांनी जिल्हाधिकारी मा राहुल कर्डीले, व वणपाल वनविभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट तहसिलदार यांना निवेदनातून मागणी केली जात आहे...