महाराष्ट्र वेदभुमी

कीर्ती कार्लेकर यांनी कर्मकांडात न रहता समाजसेवेचा संदेश दिला


वर्धा प्रतिनिधी  (तुषार रेड्डीवार); स्वर्गीय वैभवराव विठ्ठलराव   कार्लेकर  अभियंता राहणार मुल यांचां मृत्यू दिनांक 12/ 10 /2023 रोजी झाला असून  त्यांच्या मृत्यू पश्चात  विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे अवयवदान करण्यात आले होते,आज त्यांच्या अकरमासानिमित्त उमेद अनाथालय वस्तीगृह रोठा  येथे फळे ,बिस्किट व सोनपापडी  पापडीचे  तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी त्यांची पत्नी श्रीमती कीर्ती  वैभव कार्लेकर, मुलगी वैदही वैभव  कार्लेकर,तुषार रेड्डीवार ,दिपाली रेड्डी वार ,कुमारी इशिका तुषार रेड्डीवार,सौ सोनू ठाकरे ,शेतकरी योद्धा अमोल ठाकरे  ओंकार उर्फ गोलू ठाकरे, गजानन बाडे  तसेच वस्तीगृहाच्या अध्यक्ष मंगेशी मुन आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. गरज वणतानाच अन्नदान व वस्त्रदान करून गरिबांची सेवा करण्याचा मानस कीर्ती  कार्लेकर यांनी केला. त्यावेळेस वस्तीगृहातील मुलांनी अतिशय सुंदर असे गायन केले तसेच प्रत्येकाने आपापला परिचय करून दिला त्या मुलांसोबत बोलत असताना कीर्ती ताई आपल्या सर्व दुःख विसरून गेल्या होत्या. त्यामुळे उर्वरित जीवन समाज कार्यासाठी अर्पण करायचे हा निर्णय त्यांनी मनात केला

Post a Comment

Previous Post Next Post