महाराष्ट्र वेदभुमी

गणेश उत्सवातील पावित्र्य जपणाऱ्या उपक्रमांचा आदर्श समाजाने घ्यावा-रा.भू. प्रा.एल. बी. पाटील

कोमसापच्या मधुबन कट्ट्याचे वशेणी आणि खोपटे येथे काव्यसंमेलन


वशेणी-उरण(अजय शिवकर) १० सप्टेंबर उरण तालुका कोमसाप शाखाध्यक्ष श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांच्या वशेणी येथील निवास स्थानी गणपती विशेष कविसंमेलन व गीत गायन कार्यक्रम रायगड भूषण प्रा.एल बी पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार ९ सप्टेंबरला  संपन्न झाला...

या वेळेस अध्यक्षीय मनोगतातून बोलताना  प्रा.एल बी पाटील यांनी श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांच्या घरी असणा-या अडीच दिवसाच्या गणेशोत्सवाचे कौतुक केले...या गणेशोत्सवात त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप केले,शिवपार्वती भजन मंडळाचे भजन गायन आयोजन केले  आणि कोमसाप उरण शाखेचे कविसंमेलन देखील आयोजन केले... हे आयोजन म्हणजे नुसते आयोजन नसून गणेश उत्सवातील पावित्र्य जपणारे आयोजन आहे... अशा पावित्र्य जपणा-या उपक्रमांचा आदर्श समाजाने घ्यावा असे देखील मत मांडले...

   या कविसंमेलनास इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगडचे अध्यक्ष श्री.रमेश थवई आणि पेण प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन श्री.रवि पाटील ,शिवव्याख्याते श्री.धीरेंद्र ठाकूर आणि मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष श्री.रामचंद्र म्हात्रे हे उपस्थित होते...

  या कविसंमेलन व गीत गायनात कु.अनुज शिवकर, श्री.अजय शिवकर, श्री.भरत पाटील, श्री.किशोर म्हात्रे, जेष्ठ साहित्यिक श्री. नरेश पाटील, श्री.मच्छिंद्र म्हात्रे, श्री.महेंद्र पाटील, श्री.रामचंद्र म्हात्रे, श्री.हरेश्वर पाटील, श्री.धीरेंद्र ठाकूर, कुमार कराले आदींनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन श्री.भरत पाटील यांनी केले...

मच्छिंद्र म्हात्रे यांच्या निवासस्थानी वशेणी येथे हा कार्यक्रम झाल्यानंतर खोपटे धसाखोशी येथे केशव म्हात्रे यांच्या निवासस्थानी काव्य संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला...

Post a Comment

Previous Post Next Post