सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- मागील २५ वर्षांपासून दिव्यांगाच्या बौद्धिक अक्षम मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य शितलवाडी येथील स्नेह सदन मतिमंद मुलांची विशेष शाळेत सुरू आहे... या शाळेत अतितीव्र गटातील बौद्धिक अक्षम मुले जास्त प्रमाणात प्रवेशित असून त्यांना शिकविणे हे तारेवरची कसरत आहे... ज्या मुलांना परिवार सांभाळ करण्यास नकार देतो अशांना हे विशेष शिक्षक सामाजिक बांधिलकी व निरागस हेतूने कामं करित आहे... त्यातही मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्याकरिता अनेक उपक्रम राबवून मुलांनाच नाही तर शाळेला विविध नावलौकिक मिळवून दिलेले आहे...
आज शाळेचे मुख्याध्यापक श्री. पंकज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष शिक्षक दिन संपन्न झाला...शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांना मुलांद्वारा पुष्प व भेट स्वरूप अभिनंदन पत्र देण्यात आले... यावेळी शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते...
