महाराष्ट्र वेदभुमी

सोनपावलांनी घरोघरी २५४ गौराईचे कोलाड परिसरात आगमन.

कोलाड (श्याम लोखंडे) : कुटुंबात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येणाऱ्या ज्येष्ठा-कनिष्ठा अर्थात गौराई (महालक्ष्मी)चे मंगळवारी (ता. ९) रोजी कोलाड परीसरात एकुण सोनपावलांनी २५४ गौराईचे आगमन झाले...विघ्नहर्ता गणरायाच्या पाठोपाठ तीन-चार दिवसांनी येणाऱ्या गौराईच्या आगमनाबद्दल गावागावात तसेच घरोघरी कुटुंबात नेहमीच उत्सुकता असते... गौरीचा साजशृंगार, सजावट आरास आणि त्या जोडीला महापूजा व फराळ करण्यात अवघे कुटुंब दंग असल्याचे चित्र परिसरात मंगळवारी दिवसभर पाहायला मिळाले..

गणरायाच्या प्रतिष्ठापनेमुळे कोलाड परिसरात सध्या सर्वत्र हर्षोल्हासाचे वातावरण आहे... त्यातच आता मंगळवारपासून गौराईचे आगमन होत असल्याने ज्या कुटुंबामध्ये गौराई विराजमान होते, त्या कुटुंबात आनंद, उत्साह द्विगुणित होत आहे... गौरीची सर्व तयारी पूर्ण झालेली असल्याने सारेच जण गौरींची आतुरतेने वाट पाहत आहेत... गौरी तीन दिवस माहेरवाशिणी म्हणून येतात... त्यात पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्या दिवशी महापूजा, मिष्टान्नाचे जेवण व त्यानंतर प्रसादवाटप, हळदीकुंकू, तर तिसऱ्या दिवशी पूजन, दही, दुधभातांचा नैवद्य दाखवून गौरीचे पाच दिवसांच्या गणरायांसोबत विसर्जन केले जाते...

रोहा तालुक्यातील कोलाड आणि परीसरात एकुण २५४ लक्ष्मी गौराईंचे आगमन मोठया उत्साही वातावरणात साजरे होतात तर गौराईला चे साज घेऊन येतील महीला वर्ग आपल्या गावच्या वेशीवर तसेच मंदिर सभागृह येथे लक्ष्मी गौरी साजभरून सुहासिनी महीला पारंपरिक पोशाख परिधान करून गौरीमातेला जून्या चाली रूढी परंपरेनुसार नाच गाणे म्हणत घरी घेऊन येते त्यांना बैठकीवर विराजमान करतात...तर संपत्तीची देवता, लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. त्यामुळेच घरात आगमनावेळी गौरींचे ज्येष्ठा-कनिष्ठा असे दोन मुखवटे ताम्हणात घेऊन रांगोळीच्या पावलांनी वाजतगाजत बाहेरून तिला घरात आणले जाते. त्या वेळी ‘गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’ असेही म्हटले जाते. गौरींपुढे दोन बाळे पण  ठेवतात... गौरींच्या महापूजा, नैवेद्यानंतर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात...साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ, तर दुसऱ्या दिवशी मुख्यतः पुरणपोळी किंवा वडे पोळ्या करतात. तिसऱ्या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य या प्रमुख पदार्थांना प्राधान्य दिले जाते...तिसऱ्या दिवशी सायंकाळी चारनंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात नजीकच्या नदी नाले किंवा तलावात करतात...

कोलाड पोलीस ठाणे हद्दीत नऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत... तसेच दीड दिवसाचे ७८० खाजगी गणपती बाप्पाचे विसर्जन कोणतेही अनुसूचित प्रकार न होता झाले असून सहा दिवसाचे ११३८ खाजगी बाप्पा तर मंगळवारी २५४ गौरी, चें आगमन होत आहे सात दिवसांचे एक खाजगी आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी नऊ सार्वजनिक व ४० खाजगी गणपती विसर्जन होणार आहेत सदर गणेशोत्सव काळामध्ये कोलाड पोलीस ठाणे हद्दीतील आठ महत्त्वाच्या ठिकाणी सपोनी श्री नितीन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली १५ पोलीस अंमलदार तसेच होमगार्ड यांचा बंदोबस्त लावण्यात आले आहे.. हद्दीतून जाणाऱ्या मुंबई गोवा हायवेवर वाहतूक विभागाचे पोलीस तसेच कोलाड पो.ठाण्याकडील १५ पोलीस अंमलदार वाहतूक निर्माण करता लावण्यात आलेले असल्याची माहिती कोलाड पोलीस निरिक्षक नितिन मोहिते यांनी दिली...

Post a Comment

Previous Post Next Post