महाराष्ट्र वेदभुमी

पोस्कॉ महाराष्ट्र सौजन्याने शिक्षक दिनाचे औचित्य साधून विकास कॉलनी शाळेचे नूतनीकरण उपक्रम



माणगांव :- (नरेश पाटील) : ५ सप्टेंबर, २०२४ शिक्षक दिनाचे औचित्य साधून पोस्को महाराष्ट्र स्टीलने माणगांव येथील नूतनीकरण केलेल्या  रा.जि.प. शाळा विकास कॉलनीचे उद्घाटन केले...पॉस्कोने त्यांच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत नूतनीकरण केलेली ही ११ वी शाळा आहे... या उपक्रमाचा उद्देश शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे...

   या समारंभाला पोस्कोचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. इन क्यो बे व इतर कंपनी अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आदी मान्यवर उपस्थित होते... शाळेची पूर्वीची परिस्थिती दयनीय होती, गळत असलेले छत, बंद स्थितीत असणारे पंखे आणि दिवे इत्यादी. खराब झालेल्या भिंती यांची पूर्णपणे दुरुस्ती, वॉटरप्रूफिंग, रंगरंगोटी करण्यात आले...

श्री. इन क्यो बे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘जर तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचे असेल तर खूप मेहनत घेऊन अभ्यास करावा लागेल... मला खात्री आहे तुम्ही नक्की तुमचे स्वप्न पूर्ण कराल’. त्यांनी मुलांचे खूप कौतुक केले...

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूर्वा येलवे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ‘मी या शाळेवर रुजू झाले तेव्हा शाळेचे काम चालू होते...सौ. गीतांजली शेळके यांनी पोस्को कंपनीकडे मदतीची मागणी केली होती आणि पोस्कोनेही याची लगेच दखल घेऊन आज ही सुंदर शाळा उभी केली... याबद्दल आम्ही पोस्को कंपनी प्रशासनाचे खूप ऋणी आहोत’.... काही मुलांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले, मुलांना झालेला आनंद त्यांच्या मनोगतातून दिसून येत होता...

पोस्कोच्या सी.एस.आर. उपक्रमांमध्ये शालेय साहित्य वाटप, विज्ञान संच, बस सुविधा पुरविणे, शाळांची दुरुस्ती करणे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे इत्यादींचा समावेश आहे... या उपक्रमांचा उद्देश, चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करणे व विध्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी हा आहे...

पोस्कोने शाळेचे नूतनीकरण करून समाजाच्या विकासासाठी आणि शिक्षणाच्या माध्यमातून शाश्वत प्रगतीसाठी आपली जबाबदारी दर्शवली आहे... शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून, पोस्कोने विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक प्रेरणादायी आणि सुधारित शिकण्याचे वातावरण निर्माण केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post