जिल्हा प्रतिनिधी नितेश गव्हाणे
कळमेश्वर: सर्व पैसेधारक व कर्मचारी यांना न्याय मिळण्याकरिता दिनांक २/९/२०२४ सोमवार पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाला अद्यापही न्याय मिळालेला नाही, जैन प्रोजेक्ट कंपनीतील मेन प्रोजेक्ट व्यवस्थापक चेतन तोलानी यांनी साखळी उपोषणाला भेट देऊन ३/९/२०२४ रोजी सगळ्या पिडीत यांचे हिशोब करून ४/९/२०२४ तारखेला पूर्ण पैसे सगळ्यांच्या खात्यात जमा करतो म्हणून कळमेश्वर पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे यांच्या समक्ष सगळी चर्चा होऊन तरीसुद्धा ११/९/२०२४ तारीख येऊन सुद्धा अद्याप साखळी उपोषण मधील असलेल्या पीडितांना न्याय मिळालेला नाही...
जैन प्रोजेक्ट कंपनी ही उडवाउडवीचे व दमदाटीचे भाष्य करतांना दिसत आहे... हे साखळी उपोषण आता आमरण उपोषण किंवा आत्मदहन करण्याच्या मार्गांवर आहे... व पीडित सर्व पैसे धारक कर्मचाऱ्यांनी सावनेर उपविभागीय अधिकारी पोलीस निरीक्षक अनिलजी मस्के सावनेरचे एसडीओ संपत जी खलाटे यांच्याशी न्याय मिळण्याकरिता गुहार केली आहे...
