सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- दरवर्षी आगळ्या वेगळ्या कल्पनेतुन इंजेक्शनच्या झाकणापासुन गणेश मुर्ती तयार करण्यात आली... डॉ. अंशूजा किंमतकर लिंका बुक रेकॉर्ड होल्डर २०१९ अनेक टाकून वस्तूंपासून ग्रीटिंग कार्ड तयार करणे व गणपती तयार करण्यासाठी लिमका बुक ऑफ रिकॉर्ड मध्ये नाव नोंद आहे...
मागील तीन वर्षांपासून दरवर्षी गणेश उत्सवासाठी विविध प्रकारच्या वस्तूंपासून मी गणपती तयार करत आहे.. २०२२ ला मी डिस्पोसिबल ग्लासचा गणपती तयार केला होता.. २०२३ ला शिंपल्यांपासून गणपती तयार केला होता, आणि यावर्षी २०२४ ला इंजेक्शनच्या व्हायल जे वरचे प्लास्टिक रंगीबिरंगी झाकण येतात.. त्या झाकणांपासून मी गणपती तयार केला आहे...
व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे रोज दवाखान्यामध्ये आम्ही इंजेक्शन पेशंटला लावतो तर त्या इंजेक्शनच्या व्हायलला वेगवेगळ्या रंगाचे सुंदर झाकणं असतात.. आणि ते आपण फेकून देतो हे माझ्या लक्षात आलं.. मग मी मागील वर्षापासून इंजेक्शनची झाकणं जमा करायला सुरुवात केली वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या रंगाची झाकणं असतात आणि वेगवेगळ्या आकाराची झाकणं असतात, सर्व झाकणांचा उपयोग करून मी यावर्षी व्हायल झाकण उरतं त्या झाकणांपासून गणपती तयार केलेला आहे... आणि विदर्भात पहिल्यांदाच असा गणपती तयार करण्यात आला आहे...
