रामटेक पोलीस व महसुल अधिकारी समक्ष खोदुन काढला मृत्यदेह
रामटेक :- विवाहबाह्य संबंधातुन लग्नासाठी दबाव टाकणार्या प्रेयसीला प्रियकराने ओढणीने गळा आवळून हत्या केली.. आरोपीने तिचा मृतदेह रामटेक येथील अंबाळायेळील टेकळी जवळील जंगलात पुरला होता... पुरलेला मृत्यदेह काढण्यासाठी मानकापूर पोलीसांचे पथक दि.११ सप्टेंबर रामटेक येथे दाखल होताच स्थानिक पोलीस व तहसील प्रशासनातील अधिकारी घटनास्थानाकडे रवाना झाले...
महेश केशव वळसकर (४७) वर्ष रा. न्यू सोमवारी पेठ, सक्करदरा असे आरोपी प्रियकराचे नाव आहे... तर प्रिया बागडी (२४) वर्ष रा. फरस गोधनी असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे... आरोपी महेश यांची दुधाची पावडर तयार करण्याची कंपनी होती..याच कंपनीत मृतक प्रिया कामावर होती...प्रिया कामावर असतांना आठ वर्षांपूर्वी आरोपी महेश सोबत तिचे प्रेमसंबंध होते.. आरोपीने रामटेक येथे लॉज सुरू केले होते...यावेळी मृतक प्रिया ही नेहमी लॉजवर येऊन थांबत असल्याची माहिती आहे...
प्रियाचा मोबाईल आठ दिवसांपासून बंद असल्याने प्रियाच्या आईने ती हरविल्याची तक्रार मानकापूर पोलिस ठाण्यात दिली... झोन २ चे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलिसांनी प्रियाचा शोध सुरु करून प्रियाचे लोकेशन तपासले असता तिचे अखेरचे लोकेशन रामटेकमधील हॉटेलमध्ये असल्याचे समजले... हे हॉटेल आरोपी महेशचे होते.. आरोपी महेश हाच प्रियाचा संपूर्ण खर्च भागवित होता... त्यामुळे प्रिया नेहमीच आरोपीच्या हॉटेलवर जाऊन थांबायची... मागील महिनाभरापासून प्रियाने लग्नासाठी आरोपीला तगादा लावला होता... त्यामुळे प्रियाचा काटा काढण्यासाठी आरोपी महेशने तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह रामटेकपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात नेऊन पुरला... पकडल्या गेल्यानंतर अखेर मंगळवारी आरोपी महेशने प्रियाच्या खुनाची कबुली दिली... व आरोपी महेशने रामटेक येथील अंबाळा परिसरातील जंगलात पुरलेला मृतदेह बुधवार रोजी जंगलात जाऊन खोदून काढण्यात आला...
