अंबप प्रतिनिधी ( किशोर जासूद) : हातकणंगले तालुक्यातील मागासवर्गीय वसाहतीत असणाऱ्या शासनमान्य ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्र तसेच अभ्यासिकासाठी संगणक व साधन सामग्री मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.... व आमदार फंडातून ते प्राप्त व्हावेत यासाठी तालुक्याचे आमदार मा. राजू बाबा आवळे यांची भेट घेऊन चर्चा केली... व ग्रंथालयांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल... अशी ग्वाही माननीय राजू बाबा आवळे यांनी दिले...
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक आळतेकर व सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मोजेस घाटगे ,बाबासाहेब यशवंत, राजेंद्र अवघडे ,सुनील समुद्रे यांचे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते...