महाराष्ट्र वेदभुमी

मतदार जनजागृती तसेच नोंदणी कार्यशाळेचे आयोजन


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :-विद्यासागर कला महाविद्यालय खैरी (बिजेवाडा) येथे रामटेक तहसील कार्यालय तसेच विद्यासागर कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी तसेच मतदार जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले...या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून रामटेक तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार भोजराज बडवाईक उपस्थित होते... तर अध्यक्ष म्हणून विद्यासागर कला विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश सोमकुवर उपस्थित होते...

 या कार्यशाळेला श्री बडवाईक यांनी विद्यार्थ्यांना मतदानाप्रती कशी जागरूकता बाळगली पाहिजे आणि प्रत्येक अठरा वर्षाच्यावरील विद्यार्थ्यांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवले पाहिजे.. त्यासाठी असलेली ऑनलाइन प्रक्रिया समजून सांगितली... तसेच विद्यार्थ्यांना हिरहिरीने मतदान करण्यासाठी आवाहन केले... विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी कसे प्रोत्साहित केले पाहिजे हेही त्यांनी या कार्यशाळेत समजावून सांगितले... या कार्यशाळेच्या निमित्ताने अठरा वर्ष झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी कशी करायची हे शिकून घेतले... काही विद्यार्थ्यांनी नोंदणीही केली... या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. अनिल दाणी यांनी केले... या कार्यशाळेला डॉ. गिरीश सपाटे, डॉ.सावन धर्मपुरीवार, डॉ.रवींद्र पानतावणे, डॉ.आशिष ठाणेकर, राज्यशास्त्र विभाग प्रमुख ज्योती कवठे प्रामुख्याने उपस्थित होते... आभार डॉ.रवींद्र पानतावणे यांनी मानले...

Post a Comment

Previous Post Next Post