महाराष्ट्र वेदभुमी

मनसर येथील असंख्य युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात जाहीर प्रवेश.


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :-  रामटेक विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनतेचा कल शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाकडे वळला आहे. भगव्या सप्ताहाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधानसभा प्रमुख विशाल बरबटे यांचे उपस्थितीत मनसर येथील तरुणांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे...

शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्व व विचारावर विश्वास ठेवून व शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशालजी बरबटे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक येथील शिवसेना पक्ष जनसंपर्क कार्यालय येथे मनसर येथील स्वरूप वरोकर व पंकज वरोकर यांच्या सह अनेकांनी पक्ष प्रवेश केला...

यावेळी रामटेक विधानसभा प्रमुख श्री. विशालजी बरबटे व रामटेक तालुका प्रमुख श्री. हेमराजजी चोखांद्रे यांनी पक्ष प्रवेश करणाऱ्या उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या...

याप्रसंगी प्रामुख्याने श्री. विष्णू मदणकर, श्री. राजेंद्र खोरगडे, विलास सरोदे, सदानंद मोहुर्ले, रवींद्र चंदनकार, मयूर आलोवार, राजू खोरगडे, ज्ञानेश्वर सहारे, सतीश खोब्रागडे, बबन हजारे, शामलाल जांभूळे, अनिल निलेकर, पंकज सोनवाणे, आदिल परतेती, अलीखान शेख व शुभम डहरिया सह मनसर येथील अनेकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला...

Post a Comment

Previous Post Next Post