रोहा प्रतिनिधी- नंदेश गायकर : रोहा तालुक्यातील भागिरथीखार गावातील पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप.. गौरी गणपतीचा सण म्हटला की आनंदाला पारावार नसतो...प्रत्येक जण वर्षभर आतुरतेने ज्या गणरायाची वाट पाहत असतो...आणि जसा जसा हा दिवस जवळ येतो, तस् तशी ओढ प्रत्येकाला लागून राहते ती म्हणजे या गणरायाची..१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती, गणपती.. बाप्पा मोरया....
याच गणरायाची अखंड पाच दिवस प्रत्येक भाविकभक्त मनोभावे पूजा करतो....आणि जेव्हा या गणरायाला निरोप देण्याचा दिवस येतो त्यावेळी मात्र प्रत्येकाचे अंतकरण जड होऊन जाते...आणि हीच अशा उरात बाळगून पुन्हा गणपती बाप्पा आपल्या घरी लवकर यावा अशी आराधना करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना पुन्हा एकदा गणरायाला साद घालतो,आणि ती म्हणजे गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या...,लवकर या..,
याच गजरात रोहा तालुक्यातील भागिरथीखार या गावाच्या गणरायांना गावातील ग्रामस्थांनी, लेकरा बाळांनी आया बहिणींनी भावपूर्ण निरोप दिला...
