कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील चनेरा विभागातील नाव लौकीक असलेल्या खैराळे येथे जय हनुमान मित्र मंडळ खैराळे व मुंबईकर मित्र मंडळाच्या वतीने ,खैराळे धावीर मंदीर सभागृहात गणपती उत्सवाचे औचीत्य साधून येथील गुणवंत विद्यार्थी, खेळाडू,तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी,युवक,युवती,शिक्षक, सामजिक, कार्यकर्ते यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
सदरचा गुणवंत विध्यार्थी सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच अध्यक्ष परेश सकपाळ, गाव कमिटीचे अध्यक्ष शशिकांत गंभे, कु. स. संघ शाखा रोहा ग्रामीण अध्यक्ष रामचंद्र म. सकपाळ कु. स. संघ शाखा रोहा मुबंई अध्यक्ष शरद वा. गंभे चणेरा विभाग अध्यक्ष नरेंद्र म. सकपाळ विविध सहकारी सोसायटी रायगड बँक पुरस्कार कर्ते गोपीनाथ गंभे आदर्श शिक्षक रायगड जिल्हा परिषद किशोर गंभे सर, रायगड प्रीमियम लीगचे उत्कृष्ठ खेळाडू निवड दीपक गंभे,योगेश गंभे चणेरा पंचक्रोशी कुणबी विकास मंडळ उपाध्यक्ष रामचंद्र गो.गंभे,उपसरपंच मधुकर ह. सावंत युवा कार्यकर्ता शैलेश पा. सकपाळ, शिवसेना महिला आघाडी प्रमुख मेघा सावंत सहसचिव खजिनदार मितेश गंभे सह खजिनदार अनिल गंभे संघटक सुरेश गंभे मुबंई कमेटी,या प्रमूख मान्यवर आदी विदयार्थी सत्कारमूर्ती तसेच ग्रामस्थ महीला मुंबईकर मंडळी तसेच मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते...
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तसेच त्यांना शैक्षणीक साहित्यांचे वाटप त्याच बरोबर सामजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणारे नागरिकांचा सन्मान यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपलेमनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक गंभे यांनी केले तर प्रास्तविक माजी अध्यक्ष सुधीर सावंत यांनी मंडळाचे सचिव यांनी मान्यवाराचे स्वागत गीत गाऊन स्वागत केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली...


