महाराष्ट्र वेदभुमी

निवाची नळेफोडी ""स्वप्नातील गाव" (DREAM VILLAGE) घोषित



सिकंदर आंबोणकर प्रतिनिधी गोरेगाव:  दि.२४/०८/२०२४ रोजी मु निवाची नळेफोडी, ता.माणगाव, जि.रायगड.येथे स्वदेश फाउंडेशन व निवाची नळेफोडी ग्राम विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने निवाची नळेफोडी " स्वप्नातील गाव (DREAM VILLAGE)" अशा आशयाच्या फलकाचे अनावरण स्वदेश फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे व चांदोरे ग्रा.प.सरपंचा साक्षी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले...

त्याप्रसंगी कार्यक्रसाठी कृ.उ.बा.समिती सभापती रमेश मोरे, मा.सभापती सुजित शिंदे, उपसरपंच, समाजसेवक, सदस्य, गावचे सर्व पदाधिकारी, ग्रामविकास समितीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते, महीला मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यां, नवतरूण मंडळ तसेच स्वदेश फाउंडेशनचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वदेश फाउंडेशनचे समन्वय सुबोध काणेकर व त्यांच्या टीम ने फार मेहनत घेतली..

Post a Comment

Previous Post Next Post