विविध राजकियांसह शेकडो सेवक-सेविकांची उपस्थिती
शहरातुन काढली विविध झाक्यांची रॅली
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- परमात्मा एक आनंदधाम येथे भगवत कृपा षष्टी निमित्य बाबा जुमदेवजी यांचा स्वागत सत्कार कार्यक्रम माजी पंचायत समिती उपसभापती तथा भाजप महामंत्री यांचे नेतृत्वात व तसेच हजारो सेवक, सेविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रामुख्याने आमदार आशिष जयस्वाल, आ. सुधाकर कोहळे, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, प्रहार चे रमेश कारामोरे, माजी जी.प. अध्यक्षा तथा खासदार यांच्या पत्नी सौ. रश्मी बर्वे, जि .प. सदस्य संजय झाडे, भाजप महामंत्री गज्जु यादव महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व रामटेक चे ब्रँड ॲम्बेसिडर श्री लक्ष्मण मेहर ( बाबुजी ) यांचेसह विविध मान्यवर व शेकडो सेवक, सेवीका उपस्थीत होते...
दरम्यान विविध झाक्या सहभागी असलेली भली मोठी पदयात्रा कालंका माता मंदीर पासुन निघाली होती...ती शास्त्री चौक, गांधी चौक मार्गे आंबेडकर चौक व बसस्थानक पासुन आनंदधाम परमात्मा एक आनंदधाम येथे पोहाचली...यात आमदार आशिष जयस्वाल यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन किरपान, भाजप महामंत्री गज्जु यादव व शेकडो सेवक, सेवीका सहभागी झाले होते...
दरम्यान रॅली सभागृहात पोहोचल्यावर सभागृहात दिप प्रज्वलन, उद्घाटन व बाबांचा स्वागत सत्कार सोहळा पार पडला.... उपस्थीत मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला... प्रास्ताविक अर्चना अनकर यांनी केले... यानंतर प्रमुख पाहुणे तथा मान्यवरांची भाषणे झालीत.... यानंतर सरते शेवटी महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व रामटेक चे ब्रँड ॲम्बेसिडर श्री. लक्ष्मण मेहर ( बाबुजी ) यांचे भाषण झाले... कार्यक्रमादरम्यान उत्कृष्ठ कल्पना, भव्य सजावट केलेल्या झाक्यांना आकर्षक पारीतोषीक प्रदान करण्यात आले... यामध्ये विविध गावातुन आलेल्या झाक्यांचा समावेश होता... कार्यक्रमाचे संचालन सिमा नागपुरे यांनी केले. तथा व्यवस्थापन देवाभाऊ मेहरकुळे व दुर्जन बर्वे यांनी सांभाळले...शेवटी महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली...
यावेळी उपस्थितांमध्ये आमदार आशिष जयस्वाल, लक्ष्मण मेहर ( बाबुजी ), काँग्रेस चे शहर अध्यक्ष दामोधर धोपटे, बिकेद्र महाजन, विजय हटवार, गोपी कोल्हेपरा, ज्योतीताई कोल्हेपरा, बजरंग मेहर, राहुल कोठेकर, सिमा नागपुरे यांचेसह शेकडो सेवक सेवीका उपस्थित होते...