महाराष्ट्र वेदभुमी

वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सहावा वर्धापनदिन साजरा

 वशेणी गाव शिक्षणाचे माहेरघर जणू ज्ञानाची पंढरी साहित्यरत्न, रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील


वशेणी-उरण/२६ ऑगस्ट/अजय शिवकर 

   जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचा सहावा वर्धापनदिन विविध सामाजिक उपक्रम साजरे करून रविवार २५ ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला...या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रायगडभूषण प्रा.एल. बी .पाटील होते... या वेळी त्यांनी मंडळाच्या कार्याचा गौरव करताना जे काम सरकारचे आहे,जे काम स्थानिक स्वराज्य संस्थाचे आहे ते काम आज वशेणी इतिहास संपादकीय मंडळ करत आहे... टाकला संवर्धन,समुद्र किना-याचा अभ्यास, जेष्ठनागरिकांना सिटिंग बेंचेस, पाणी साठवण , एकादशी साज-या करणे या सारख्या छोट्या छोट्या उपक्रमातून जनसेवेचा आनंद देणारे आणि गावाचा इतिहास लिहिणारे हे एकमेव मंडळ आहे...असे गौर उद्गगार काढले...

  सदर कार्यक्रमास उरण पंचायत समिती शिक्षण विभागाच्या डाटा ऑपरेटर निलम पाटील, उरण शिक्षक पतपेढीच्या चेअरमन सौ.शर्मिला गावंड, डी.एस.स्कूल कला सायन मुंबईचे श्री.तानाजी मांगले,अहमदनगर जिल्हा सामाजिक कार्यकर्ते बच्चा ओमप्रकाश मल्लिकार्जुन, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल ठाकूर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.सदाशिव पाटील, श्री.गजानन गावंड आदि मान्यवर उपस्थित होते...

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बी.जे.म्हात्रे यांनी केले तर प्रास्ताविक मंडळाचे कार्यवाहक श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले...प्रास्ताविकात मंडळाने केलेल्या वर्षभरातील कार्याचा परिचय दिला...

 यावेळी आपल्या कार्यातून आपापल्या परीने  गावाची सेवा करतात त्यांना वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून जनसेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले...

1) सौ अपर्णा निळकंठ पाटील (अध्यात्मिक जनसेवा पुरस्कार)

2) श्री. पद्माकर धर्माजी म्हात्रे)

(अध्यात्मिक जनसेवा पुरस्कार)

3)श्री.हसुराम नारायण म्हात्रे

(सामाजिक योगदान जनसेवा पुरस्कार)

4)श्री.प्रसाद बाळाराम पाटील 

(सामाजिक ग्रामीण जनसेवा पुरस्कार)

5) अ‍ॅड. गुलाबराव गावंड 

(सामाजिक योगदान पुरस्कार)

6)श्री.प्रकाश सदाशिव पाटील- पुनाडे (आरोग्य जनसेवा पुरस्कार)

7) श्री.अजय शिवकर - केळवणे 

(पत्रकारिता जनसेवा पुरस्कार)

8)श्री.विलास कमल म्हात्रे 

(बहुव्यवसायीक जनसेवा पुरस्कार )

  शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून वशेणी गावाचेव नाव उंचावण्या-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला...

1) कु.सोहम राजेंद्र गावंड ( सि.ई.टी परीक्षा 97.73 परसेन्टाईन गुण)

2)कुमारी सृष्टी पुरण पाटील (इयत्तावआठवी शिष्यवृत्ती )

3) कुमारी सृष्टी मनोज गावंड 

(इयत्ता आठवी  शिष्यवृत्ती)

4) कुमारी साक्षी रतिलाल पाटील 

(एस एस सी परीक्षा प्रथम क्रमांक)

5) कुमारी जान्हवी संजय पाटील 

(12 वी काॅमर्स 89%गुण

6)कुमारी दिक्षिता क्षितिज पाटील

  (12 वी सायन्स सर्वाधिक गुण)

7) कुमारी विशाखा विष्णू वाघ

(नवोदय विद्यालय प्रवेश)

   शाळांना स्वच्छता विषयक मूल्यांची रूजवणूक व्हावी या दृष्टीकोनातून स्व.बाळाराम सिना पाटील यांचे स्मरणार्थ वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून रा.जि.प शाळा वशेणी, पुनाडे,सारडे, पिरकोन ,आवरे, गोवठणे ,डाऊरनगर तर माध्यमिक शाळा रामचंद्र म्हात्रे विद्यालय  आवरे, क.भा.पाटील.वि.पिरकोन, छत्रपती शिवाजीमहाराज हायस्कूल वशेणी, रायगड एज्युकेशन सोसायटी वशेणी,

त्याचप्रमाणे पूर्व प्राथमिक रजनी  भरत म्हात्रे संस्था आवरे, वशेणी अंगणवाडी  .एकूण १५ शाळांना पाच लिटर फिनेल चे किट वाटप करण्यात आले...

  या वेळेस उरण पंचायत समिती शिक्षण विभाग सुध्दा स्टेशनरी साहित्य आणि फिनेल किट देण्यात आला...

   या वेळेस वर्धापनदिन दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन पध्दतीने घेतलेल्या राज्यस्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले...

प्रथम क्रमांक- सौ.साईगीता गणेश सब्बन  -अहमदनगर 

व्दितीय क्रमांक- श्री.रितेश रमेश मोकल - उरण

तृतीय क्रमांक  कुमारी संस्कृती संदीप घडवले- शिव मुंबई 

उत्तेजनार्थ- श्री.राजेश चोगले, श्री.विनायक गावंड,सौ.मुग्धा सागवेकर,कुमारी आर्या सकपाळ,कुमारी तृप्ता मांगळे आदी विजयी स्पर्धकांचा गौरव करण्यात आला...

 सदर कार्यक्रमास श्री.गणेश खोत, श्री.मनोज गावंड, श्री.संदेश गावंड, श्री.संजय पाटील,कैलास पाटील, श्री.सतिश पाटील, सौ.प्राजक्ता म्हात्रे,  सौ.संगिता गावंड, सौ.मिनल पाटील,श्री. अनंत तांडेल, श्री. प्रविण ठाकूर, श्री.पुरूषोत्तम पाटील, विश्वास पाटील ,डाॅक्टर रविंद्र गावंड,आदी मान्यवर उपस्थित होते...



Post a Comment

Previous Post Next Post