महाराष्ट्र वेदभुमी

सापांची ओळख व संरक्षण या विषयावर चर्चासत्र


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

 रामटेक :- पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय येथे संस्थेचे सचिव मयंकराव देशमुख व सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल विजय येरपुडे यांचे मार्गदर्शनाखाली नागपंचमीच्या सणाचे औचित्य साधून ‘सापांची ओळख व संरक्षण’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले...

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक राजीव तांदूळकर, सर्पमित्र अजय राऊत, प्रेम राऊत यांनी विद्यार्थ्यांना अन्नसाखळीतील सापांचे महत्त्व, विषारी, बिनविषारी व निमविषारी सापांची ओळख कशी करावी ? या विषयांवर मार्गदर्शन केले... सर्पमित्र सुमित भागडकर, आकाश राऊत, समीर राऊत, उज्ज्वल मिसार, रोशन भागडकर, साहिल भोयर, मनीष राऊत हे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते...कार्यक्रमाला १०२ विद्यार्थी उपस्थित होते... शाळेतील राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक शिक्षक साक्षोधन कडबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केले... दिलीप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले... सर्वश्री शिक्षक अनिल कोल्हे, सतीश जुननकर, शैलेंद्र देशमुख, प्रशांत पोकळे, अमित मेश्राम, प्रा. अरविंद दुनेदार, प्रा. सुनील वरठी, रितेश मैंद, संगणक शिक्षिका करीना धोटे, राशिद शेख, मोरेश्वर दुनेदार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले...

Post a Comment

Previous Post Next Post