महाराष्ट्र वेदभुमी

सानेगाव आश्रम शाळेत जागतिक आदिवासी व क्रांतिकारी दिन साजरा


रुपेश रटाटे: धाटाव : दिनांक ०९ ऑगस्ट शुक्रवार रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड येथे जागतिक आदिवासी दिन व क्रांतिदिन असा संयुक्तिक कार्यक्रम घेण्यात आला... कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री.फसाळे सर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली...तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा.श्री.राजाराम सिताराम वाघमारे लाभले... यावेळी शालेय स्कुल कमिटीचे सदस्य मा.श्री. मोतीराम लेंडी,सानेगाव-यशवंतखार ग्रुपग्रामपंचयातीचे माजी सदस्य श्री तुषार ठाकूर उपस्थित होते...

विद्यार्थ्यांनी केला आदिवासी पेहराव.

 कार्यक्रमाची सुरुवात पूजनाने झाली.आदिवासी नेते व क्रांतिकारक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला... त्यानंतर ईशस्तवन,स्वागतगीत, विद्यार्थ्यांच्या भाषणांसह सांस्कृतिक कार्यक्रमात प्रामुख्याने नाचगाणे, नाटक,बक्षीस वितरण समारंभ झाला...

शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्षीय भाषणात आदिवासी दिनाचे महत्त्व समजावून सांगितले... शेवटी आभारप्रदर्शन झाले. आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे आभार मानले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.दिलीप.मा.सकपाळ तर सूत्रसंचालन श्री.योगेश धुमाळ तसेच आभारप्रदर्शन श्री मिथुन जोगळेकर यांनी केले...

        सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक वर्ग,कर्मचारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post