रिलायन्स फाउंडेशननी दिले मुलांना बसण्याचे बेंच
रुपेश रटाटे : शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक सानेगाव आश्रम शाळा येथे गेली कित्येक वर्ष शाळेमध्ये शिकणारी सर्व निवासी मुलं हि वर्गामध्ये खाली जमिनीवर बसून शिकत असताना श्री मिथुन जोगळेकर पदवीधर शिक्षक यांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या अथक प्रयत्नातून शाळेला रिलायन्स फाउंडेशन यांच्याकडून जुने बेंचस कसे उपलब्ध होतील हे पाहिले गेले...
पदवीधर शिक्षक श्री मिथुन जोगळेकर यांच्या प्रयत्नांना यश.
बेंचेससाठी रिलायन्स फाउंडेशनकडे मागील काही दिवस पर्यंत पाठपुरावा करत होते... रिलायन्स फाउंडेशनचे अधिकारी श्री.अरविंद बुरूमकर यांच्याशी संपर्क साधून या बेंचेस साठी पाठपुरावा करून यासाठी प्रस्थाव श्री बुरूमकर यांनी रिलायन्स फाऊंडेशनकडे ठेवून याविषयी माहिती दिली...त्यानुसार तात्काळ मान्यता देण्यात आली आणि लगेचच शासकीय आश्रम शाळा सानेगाव यांना बेंचसची मंजूरी करण्यात आली.. श्री मिथुन जोगळेकर यांनी शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री मधुकर रावजी फसाळे व शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार चेंडके सर यांच्याशी बोलणे करून बेंच आणण्याची सोय कशी करता येईल हे प्रामुख्याने पाहिले आणि लाखो रुपयाचे असणारे ही अमूल्य भेट रिलायन्स फाउंडेशनकडून शाळेला मिळण्यासाठी श्री मिथुन जोगळेकर यांनी खूप प्रयत्न केले...त्यामुळे गेली कित्येक वर्ष जमिनीवर बसून धडे गिरवणारी मुलं चांगल्या बाकड्यांवर बसून शिक्षण घेताना पाहायला मिळाली... यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालंय.. त्यासाठी श्री मधुकर फसाळे आणि श्री राजकुमार चेंडके यांचे विशेष कौतुक होत आहे..

