महाराष्ट्र वेदभुमी

स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचा शिलेदारांचं कौतूक, संवर्धन कार्यासाठी लागणारे साहित्य वाटप.


कोलाड (श्याम लोखंडे) : रोहा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले त्याच बरोबर गडकोट संवर्धन कार्याची आवड असणारे महेश खांडेकर यांनी आपल्या जन्मदिवसाचं औचित्य साधून रोहा तालुक्यातील गडसंवर्धन कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांच्या शिलेदारांना गडसंवर्धनासाठी लागणारे साहित्याचे वाटप केले..

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला. खांब विभाग परिसरातील स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या अखंड सुरगड संवर्धन कार्याचा आढावा घेत संस्थेच्या माध्यमातुन गडकोटांचे संवर्धन आणि संरक्षण करणारे शिलेदार यांना विशेष आमंत्रित करत यावेळी महेश खांडेकर यांच्या सहकार्याने व मैत्री प्रतिष्ठान रोठ च्या वतीने या संस्थेला गड संवर्धनाचे व त्या कार्यासाठी विविध प्रकारच्या साहित्यांचे वाटप करत उपस्थितीत शिलेदार यांचे विशेष स्वागत करत संवर्धासाठी उपयुक्त लागणारे घमेल आणि फावडे असे विविध साहित्य सुपूर्द केले..

प्रसंगी यावेळी महेश खांडेकर, मैत्री प्रतिष्ठान रोठ या संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश वारंगे त्याच बरोबर सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला तर कार्यक्रमासाठी सुरगड संस्थेचे संपर्क प्रमुख कु. मयुर मालुसरे त्याचबरोबर स्वप्निल विचारे, कु. विशाल पवार आणि कु. रितेश पवार हे उपस्थित होते. तसेच कु.मयुर मालुसरे यांनी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या वतीने महेश खांडेकर यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आणि त्यांनी गडसंवर्धन कार्यासाठी दिलेल्या साहित्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले...

Post a Comment

Previous Post Next Post