महाराष्ट्र वेदभुमी

केळवणे गावाची मानाची दहीहंडी हर्ष जल्लोषात साजरी


केळवणे पनवेल२७ ऑगस्ट अजय शिवकर : अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात दहीहंडीचा उत्सव ठिकठिकाणी जल्लोषात साजरा करण्यासाठी बालगोपाळ उत्साही असतात... दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक शहर प्रत्येक गावात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो... यासाठी गोविंदाचे ग्रुप्स आणि आयोजक अनेक दिवसांपासून तयारी करत असतात...


पनवेल तालुक्यातील सर्वात मोठे गाव केळवणे येथील उत्कृष्ट असा   ओळखला जाणारा KGSC संघ हा सातत्याने केळवणे गावातील सांस्कृतिक सण साजरे करत  आहे...

  दरवर्षीप्रमाणे  यंदाही गोविंदा हा सण सांस्कृतिक आणि पारंपारिक पद्धतीने   करून त्याचे उत्कृष्ट आयोजन   केळवणे गावांमध्ये बघायला मिळत आहे... सकाळपासूनच  गाव आणि गावातील रस्त्यांवर कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे. 'गोविंदा आला रे आला'चा गजर गल्लीबोळात ऐकू येत आहे. दहीहंडी फोडण्यासाठी  विविध भागातील तरुणांचे ग्रुप्स निघत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post