महाराष्ट्र वेदभुमी

रामगिरी गुरु नारायण महाराजांच्या विरोधात मुस्लिम समाजाकडून मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार

दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी


शहानवाज मुकादम/रोहा : दोन समाजांमध्ये जाणून-बुजून जातीय तेढ निर्माण करून धार्मिक कलह,द्वेष पसरवून मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याने रामगिरी गुरुनारायण गिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून  तातडीने अटक करण्याची तक्रार मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री उदय झावरे यांच्याकडे मुरुड तालुका मुस्लिम समाजाकडून करण्यात आलीय.. काही दिवसांपूर्वी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांनी एका सभेत मोहम्मद पैगंबर यांचे विषयी काही अप वक्तव्य केल्याने जागतिक मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या..

 मोहम्मद पैगंबर (स.अ.व.स.) हे इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित असून त्यांचा उल्लेख कुराणांमध्ये रहमतुललील आलमीन म्हणजेच जगासाठी परोपकारी म्हणून केला आहे... त्यांनी आपल्या जीवनात जगाला सहिष्णुतेचे, बंधुभाव व शांततेची शिकवण दिली आहे.. जे मुस्लिमांचे पैगंबर व श्रद्धास्थान आहेत...

 रामगिरी महाराजांचे वक्तव्यामुळे संपूर्ण मुसलमानांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत...तरी रामगिरी महाराजाना त्वरित अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे या निवेदना मध्ये नमूद केले आहे...

 रामगिरी महाराजाने त्यांच्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मीयाबाबत व त्यांचे पैगंबर मुहम्मद (स.अ.व.स.) यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर  बदनामीकारक विधान केले आहे, त्यांच्या या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुशीत करून जातीय तणाव धार्मिक द्वेष पसरवीत आहेत...

 सध्या पवित्र गोकुळाष्टमी व गणेशोत्सव सन तोंडावर असून तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य रामगिरी महाराजांकडून केले जाणे म्हणजेच जातीय तेढ निर्माण करून दोन समाजांमध्ये दंगल घडवून आणण्याचे प्रयास या महाराजांकडून होत असल्याचे सुद्धा या निवेदनामध्ये म्हटले आहे...

 मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी आलेल्या शिष्ट मंडळाला चांगलेच प्रतिसाद देऊन तुमचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच संबंधित कार्यालयाकडे पाठवून लवकरात लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे...

 सदरचे निवेदन सादर करताना डॉ.निसार बिरवाडकर, मुसाद्दिक कादिरी, राहील कडू, अस्लम हल्डे, सैफुल्लाह फिर्फिरे, रिझवान फहीम, फैसल उल्डे, लियाकत कासकर तसेच मुरुड तालुका जमातीचे 17 गावातील जमातीचे जवळपास 100 सदस्य  उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post