सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- देवलापर हा परीसर आदिवासी बहूल असुन येथे अनेक समस्या आहे...आतापर्यत कोणत्याही नेत्याने लक्ष दिले नसले तरी आता मात्र येथील विविध समस्यांकडे जातीने लक्ष देण्यात येईल... त्याचप्रमाणे येथे झालेल्या अपघाताकडे वळले असता अनेकांना अपघातात प्राण गमवावे लागले त्यामुळे येथे अडरपास होने गरजेचे आहे... त्याकरीता लवकरच संसदेत मुद्दा मांडून उड्डाण पूल (अंडरपास) देवलापार व करवाही येथे करण्यात येणार असल्याने त्यांन सांगीतले...
याशिवाय अनेक समस्यांना दुजोरा देत त्यांनी क्रमाक्रमाने सोडविण्याकरीता प्राधान्य देणार असल्याचे सांगीतले...ते देवलापारच्या विद्या सेलिब्रेशन हॉल येथील सत्कार समारंभात बोलत होते...सदर कार्यक्रमाचे आयोजन रामटेक तालुका कॉग्रेस कमेटी तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते...
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुनिल केदार तर प्रमुख पाहुणे जिल्हा कॉग्रेस कमेटीच अध्यक्ष तथा माजी मंत्री राजेंद्र मुळक, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राउत, माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, पंचायत समितीच्या माजी सभापती कला ठाकरे, जिल्हा परीषद सदस्य दुधाराम सव्वालाखे, प्रहारचे रमेश कारामोरे, शिक्षण सभापती राजू कुसुंबे, सेवानिवृत्त वनअधिकारी शिमराम भलावी, पंचायत समिती सदस्य रविद्र कुमरे, देवलापारच्या सरपंच सारीका उईके, करवाहीचे रंजीत कोकोडे आदी उपस्थित होते...
नागपूर जिल्हा कॉग्रेस कमेटीच अध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी खासदार निवडून दिला आता पुढे आमदारही महाविकास आधाडीचा निवडुन देण्याची विनंती नागरीकांना केली...तसेच कॉग्रेस पक्षाचे संघटन कसे मजबूत होईल याकडे लक्ष देण्याचे आवाहन उपस्थितांना केले... यावेळी भव्य पुष्पहाराने नवनियुक्त खासदार श्यामकुमार बर्वे यांचा सत्कार करण्यात आला... यानिमित्याने सुनिल केदार, राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे, रमेश कारामोरे, मुक्ता कोकड्डे, रश्मी बर्वे यांनी आपले विचार व्यक्त केले... यावेळी मॉ भगवती संस्थान देवलापार, लोकमत सखी मंच, महिला बचत गट, उमेद महिला कल्यानकारी संघटना तसेच अनेक संघटनांनी सत्कार केला...तसेच अनेक युवकांनी व संघटनांनी समस्यांची निवेदने दिली... कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परीषद सदस्या शांता कुमरे यांनी तर आभार कैलास राऊत यांनी मानले... यावेळी परीसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरीक मोठ्या संख्येन उपस्थीत होते...
