माणगाव (नरेश पाटील): गेली अनेक दिवसांपासून शहरात वारंवार वीज खंडीत होत आहे...तर याबाबत विज खंडीत होत असल्याचे विषय संबंधीत विभागास संपर्क साधून जाणुन घेतले असता असा समजले की विद्युत पोलावर वेलींची वाढ झाल्याने ट्रान्सफॉर्मर वर ताण पडून ट्रीपर उडत असल्याची अजब उत्तरे देण्यात आली... याबाबत अधिक माहिती अशी आहे की, गेली अनेक दिवसांपासून माणगाव शहर अनु तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात वारांवार विज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सर्रास घडत आहे...दुसरीकडे या पावसाळा काळात गेली १० ते१२ दिवस पाऊस विश्रांती घेत असल्याने वातावरणात तापमान वाढले आहे...जो २७ ते ३२ सेलसियस डीग्री असल्याने तीव्र उष्णता व उखाडा जाणवत आहे...रात्रीही तापमानात गरमी जाणवत आहे... तर लाईट नसणे आणि उखाडा अशी दिवस आणि रात्रीही परिस्थिती असल्याने ही एक लोकांची नवी समस्या बनली आहे...
दरम्यानचा काळत शनिवारी दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळपासुन ते दुपारीपर्यंत वारांवार विज गायब होत असल्याचा कहर पाहायला मिळत होते... तर विज पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता अधिकारी यांच्याशी आधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क केले असता, असे समजले की गेल्या काही दिवसा पूर्वी अतिवृष्टी झाल्याने वेलींची नैसर्गिक वाढ झाल्याने अनेक विद्युत पोलावर वेलीचे साम्राज्य पसरल्याने आणि त्यात या ओल्या वेली तसेच अर्थिंग प्रवाहामुळे विद्युत तारेवर ताण पडून ट्रीपर उडत आहे.. परिणामी विज खंडीत होत आहे. पुढे असे ही त्या अधिकार्यांनी सांगीतले की आमचा हद्दीत अनेक वीजेचा खांबावर वेलीचे साम्राज्य वाढल्याने अशा सर्व पोलांवर युदधपातळीवर गेली अनेक दिवस काम चालू आहे.. आणि विद्युत पुरवठा तात्पुरता त्या त्या भागत खंडीत करुन वेली हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे सांगितले.. मात्र अशी अजब उत्तर मिळाल्याने अजब गोष्ट समोर आली की खरच वेलींची वाढ झाल्याने विद्युत पुरवठा ट्रीप होवून खंडित होतो की काय ? असा प्रश्न पडला आहे...
तर आमच्या प्रतिनिधि यानी असाच एका विद्युत पोलावर वेलीची वाढ आहे की पाहण्यास निरीक्षण केले असता तर एका विद्युत पोलावर पूर्णतः सुखलेला वेलीची साम्राज्य पाहायला मिळाले... मग प्रश्न पडला की पोलावरची वेली तर पूर्ण सुखलेली आहे मग ट्रिप कसा होवू शकते... दरम्यानचा काळात मंगलवार दी.१४ ऑगस्ट रोजी दुपारी ०१:३० चा आसपास मोर्बा रोड येतील हॉटेल पवार वाडाच्या काही अंतरावर विद्युत कर्मचारी यानी एका पोलावर काम करताना दिसून आले... त्यांना लाईट कधी येणार म्हणून विचारले असता उत्तर दिले की वरुनच अर्थात सब स्टेशन येथून ही लाईट गेली आहे... तर अमच्या भागत कुठे फॉल्ट आहे ते पाहण्यास या ठिकाणी आलो आहे... मात्र येते काहीही प्रॉब्लेम नाही तर वरून् मेन लाईन गेली असल्याचे उत्तर दिले...
यादरम्यान शनिवारी दी. १७ रोजी दुपारी खांदाड येतील सार्वजनिक शौचालय जवळ कर्मचारी डिपी जवळ काम करताना दिसले तर त्यांच्याकडे विज सकाळपासूनच वारंवार खंडीत होत असल्याचा विषय सांगितला.. तर काम चालू आहे. लाईट थोड्या वेळात सुरु होतील असे त्यांनी सांगितले... दरम्यान ग्रामीण भागातील एका शेतकरी महीला यांनी सांगितले की एकदाच काय असेल ते काम करा... परंतु वारंवार वीज खंडीत करु नका... यासाठी तीव्र नापसंती व्यक्त केली.. या बाबी विद्युत अधिकारी यांना संपर्क केले असता अनेक पोल स्वार वेली हटविण्याची मेंटेनन्स काम दुर्गम भागात, ग्रामीण भागात तसेच शहरातील काही ठिकाणी चालु आहे आणि असेही निदर्शनास आणुन दिले की जिथे जिथे पोल स्वार वेली आहेत त्यांचे फोटो, एरियासह कृपया शेअर करा अशी विनंती केली...
मात्र गेली अनेक वर्ष पावसाळ्यात विज वारंवार खंडीत होण्याचा प्रकाराची अनुभव मुळीच आला नाही.. जो यंदाचा पावसाळ्यात वेली मुळे वारंवार वीज गायब होत असल्याची नवीन बाब ऐकण्यास मिळाली आहे.. त्यामुळे अनेक प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत... असो परंतु समस्या लवकरात लवकर सुटून या गरमीतून सुटका होण्याची नागरीक वाट पाहात आहे...

