महाराष्ट्र वेदभुमी

सनातन संस्थेच्या वतीने भोकरपाडा येथे महिला सबलीकरण विषयावर मार्गदर्शन


विशेष रायगड :- आजची सद्याची वाढते स्थिती महिलांवर होणारे अत्याचार,  मानवतेला काळीमा फासणारी हत्या, आत्महत्या असे अनेक प्रसंग पाहता त्याला सामोरे जाण्यासाठी त्यांचे शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक बळ वाढणे आवश्यक आहे... हा उद्देश लक्षात घेऊन सनातन संस्थेच्या वतीने १६ ऑगस्ट या दिवशी भोकरपाडा, पनवेल येथे महिलांसाठी महिला सबलीकरण  या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले... सनातन संस्थेच्या सौ. वंदना आपटे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले...

उपस्थितांना मार्गदर्शन करताना , महिलांवरील  होणारे अत्याचार रोखण्यासाठी शरीराने तसेच मनाने कणखर होण्यासाठी प्रत्येक महिलेने काय प्रयत्न करावेत, प्रत्येक मुलीने स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे...  त्याचप्रमाणे तसेच मनाची ताकद वाढवण्यासाठी नियमित प्राणायाम व व्यायाम करणे आवश्यक आहे... आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना याबद्दल आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे...  आपल्याकडे जे सर्व आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच माहिती असणे हेही आवश्यक आहे... याबद्दल ही सौ. वंदना आपटे यांनी माहिती दिली... त्यांच्या समवेत सनातच्या श्रीमती पुष्पा साळुंके याही उपस्थित होत्या. सौ. कल्पना शेंडे यांनी या कार्यकर्माची व्यवस्था पहिली... या कार्यक्रमाला २० महिला उपस्थित होत्या...

Post a Comment

Previous Post Next Post