उरण. /१८ ऑगस्ट/अजय शिवकर: दर महा १७ तारखेला होणा-या कोमसाप मधुबन कट्ट्यावर झालेल्या कविसम्मेलनात कवींच्या कवितांतून श्रावण सरी बरसल्याचा श्रोत्यांनी मनसोक्त आनंद घेतला...कार्यक्रमाचे अध्यक्ष तानाजी गायकवाड होते... सूत्रसंचालन संजीव पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अजय शिवकर यांनी केले..
कार्यक्रमाला साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी पाटील...सूर्यकांत दांडेकर, नीळवर्ण दत्तारा, भुवनेश पाटील, विजय कांबळे, अनंत पाटील, विकास पुरो, देवचंद कोळी, संजय पेंडसे यांची प्रमुख उपस्थिती होती...
कार्यक्रमापूर्वी कोमसाप उरण आणि ज्येष्ठ नागरिक उरण यांनी कवी, संघटक कै अर्जुन हंडोरे यांना श्रद्धांजली वाहिली...
कविसम्मेलनात ज्येष्ठ कवयित्री अक्षता गोसावी,अनुज शिवकर,अनुपमा रास,एस.एस.पाटील,एन जी पाटील,सुरेश आपणकर, मारुती तांबे,अजय शिवकर, संग्राम तोगरे, सुनील पाटील,यांनी सुरेख सावन कविता गायिल्या....कवितांचा आनंद मनमुराद घेता आल्याचे अध्यक्षीय भाषणात तानाजी गायकवाड यांनी सांगितले...
