महाराष्ट्र वेदभुमी

शेतात ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू...


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :-  देवलापार पोलीस स्टेशन हद्दीतील चोरबाहुली येथे शेतात चिखलनी करत असताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा दबून मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली आहे...

चोरखुमारी येथील रहिवासी दिलीप आहाके वय अंदाजे ४२ वर्ष हे चोरबाहुली हद्दीतील शेतात चिखलनी करायला गेले असतांना अचानक ट्रॅक्टर पलटी झाला...ट्रॅक्टर पूर्णपणे चालकाच्या अंगावर पडल्याने ट्रॅक्टरखाली दबून त्याचा मृत्यू झाला...

घटनेची माहिती देवलापार पोलिसांना मिळताच देवलापार पोलीस व टोल प्लाझा कर्मचारी घटनास्थळी पोहचले व मृतकाला शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले असुन वृत्त लिहिस्तोवर पोलीस ठाण्यात  कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती...

Post a Comment

Previous Post Next Post