कोलाड (श्याम लोखंडे) : तुम्ही वयोरुद्ध झालात म्हणून कोणीही डगमगून जाऊ नका ज्यांचे कोणीही नाही त्यांनी घाबरून जाऊ नये,ज्यांचे कौटुंबिक वाद शेती व्यवसायातील तसेच बँकेत तसेच विविध गुंतवणुकी बाबत कोणतीही समस्या निर्माण झाल्यास आशा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचे प्रतिपादन कोलाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन मोहिते यांनी कोलाड विभागीय स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा १४ वा वर्धापन दिन सोहळ्यातील कार्यक्रमात केले...
रोहा तालुक्यातील स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांचा १४ वा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ३ ऑगस्ट रोजी श्रीमती. राजश्री वसंत महाबळे आंबेवाडीनाका यांच्या निवास्थानी टेरेसवर मोठया उत्साही वातावरणात तसेच आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी कोलाड पोलीस निरिक्षक नितीन मोहिते बोलत होते...
गेली चौदा वर्षे येथील ज्येष्ठ नागरीक एकत्रितपणे विविध प्रकारचे उपक्रम राबवत असून एकमेकांस चांगले सहकार्य करण्याचे काम करत असून या संघटनेचे कार्य अविरतपणे चालू आहे तसेच या सुखमय सोहळ्यात मला निमंत्रित करुन माझा यथोचित सन्मान केल्याचा आनंद व्यक्त केला.तसेच चौदावा वर्धापनदीन आणि वार्षिक स्नेह संमेलन संघटनेचे अध्यक्ष मारूती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोलाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक नितीन मोहिते यांच्या प्रमूख उपस्थित संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आंबेवाडी ग्राम पंचायतीचे सरपंच सुरेश दादा महाबले रोहा तालुका महिला संघटनेच्या अध्यक्षा तथा आंबेवाडी ग्राम पंचायत सदस्या सौ प्रितमताई पाटील, रोहा तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर, संघटनेचे माजी अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले,ज्येष्ठ नागरिक महिला संघटनेच्या अध्यक्षा सौ अलका पांढरकामे, नारायण धानवी, हभप नारायण महाराज दहिंबेकर, महादेव महाराज महाडिक, प्रवीण गांधी, अविनाश म्हात्रे, आण्णा पवार, सौ प्रणिता गांधी, दिवाण सानप,पोलीस सहकारी नरेश पाटील, आदी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते...
अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या वर्धापदिनानिमित्त वय वर्ष ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक सभासदांचा सदस्य नंदकुमार पवार यांच्या वतीने काठी व सन्मानपत्र भेट वस्तू देत त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आले, तर विशेष ज्या दापंत्यांच्या विवाहाला वय वर्ष ५० पूर्ण झालेल्या हयात भाग्यवंत दांपत्य यांना देखील भेट वस्तू देत प्रमुख उपस्थितीत पाहुण्यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आले.तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य नोंदिंसाठी ज्या ज्या सभासदांनी परिश्रम घेतले आशा सभासदांचा देखिल यावेळी सत्कार सन्मान करण्यात आले...
प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन,गणेश पूजन, इश्र्वस्तवन, स्वागत गीताने करण्यात आली तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाच्या सीमेवरील रक्षण करणारे शहीद जवान तसेच विविध क्षेत्रातील त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे दिवंगत सदस्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तद्नंतर उपस्थित पाहुण्यांचा स्वागत संघटनेच्या वतीने करण्यात आला...तसेच वार्षिक अहवाल वाचन करण्यात आले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण गांधी यांनी केले तर सूत्रसंचालन अविनाश म्हात्रे यांनी केले कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने अल्पोहाराने कऱण्यात आली...यावेळी सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले...
