महाराष्ट्र वेदभुमी

प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते नथुराम येळकर यांचे दुःखद निधन

पुगांव-खांब(नंदकुमार कळमकर) : रोहा तालुक्यातील पुगांव गावचे प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते नथुराम पांडुरंग येळकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या निधनाने येळकर परिवारावर दुःखाचे डोंगर तसेच पुगांव परिसरात शोककळा पसरली आहे...

नथुराम येळकर हे सर्वाचे 'आप्पा' या नावाने सुपरिचित शेती व्यवसाय करत त्यांनी त्याकाळात रायगड बाजार कोलाड येथे 'वॉचमन' चे काम कर्तव्यदक्षपणे पार पाडत ते या सेवेतूननिवृत्त झल्यानंत पुन्हा वडिलोपार्जित उत्तम प्रकारे शेती करत होते...त्यांचा स्वभाव शांत संयमी प्रेमळ असा होता.तसेच सर्वांच्या परोपकारी पडणारी संयमी वृत्तीच्या,मित भाषी, नम्र, आणि विनोदी स्वभाव,व दयाळू अंतःकरणाची,पशु- प्राण्यांवर अथक प्रेम करणारे मोठे व्यक्तिमत्व होते...त्यांच्या अचानक जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे...

त्यांच्या निधानाची वार्ता समजतात गाव परिसरातील तसेच रोहा तालुक्यासह विविध स्तरांवरील समाजातील सामाजिक शैक्षणिक व राजकीय आप्त-स्वकीय मित्र परिवार व नातेवाईक सगेसोयरे त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सांत्वन करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली...

त्यांच्या पश्चात दोन मुले,चार मुली,भाऊ,पुतणे -पुतण्या, सुना, नातू-नाती, नात-सुना, पतवंडे असा परिवार आहे त्यांचे दशक्रियाविधी बुधवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजी श्री कमलेश्वर शिवमंदिर शेजारील तलावावर येथे.तसेच उत्तरकार्य धार्मिकविधी तेरावा शनिवार १० ऑगस्ट २०२४ रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे पुगाव येथे संपन्न होणार आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post